Plastic Bottles Saam Tv
लाईफस्टाईल

Plastic Bottles Side effects : सावधान! प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी पिताय? अत्यंत गंभीर आजार होण्याचा धोका

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी हे महत्त्वाचे आहे.

डॉ. माधव सावरगावे

Plastic Bottles side effects : पाणी हे आपल्या जीवनातील सर्वात मुख्य घटक आहे. पाण्याशिवाय जगणे कठीणच ! शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी हे महत्त्वाचे आहे. परंतु, हे पाणी पिण्यासाठी आपण साधरणत: प्लास्टिकच्या बाटलीचा वापर करतो. प्लास्टिक बाटलीमधले पाणी पिऊन आपले तहान भागते परंतु, यामुळे अनेक आजार देखील उद्भवतात.

प्लास्टिक वाटलीमध्ये पाणी पिणे हे अनेकांच्या दैनंदिन सवयीचा भाग बनले आहे. घरात, कार्यालयात किंवा बाहेर असताना प्लास्टिक बाटलीमध्ये पाणी पिणारे बहुसंख्य आहेत. मात्र, हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञ म्हणतात, की प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिणे स्लो पॉयझन असून, यामुळे मधुमेह, आतड्यांचे आणि पोटाचे विकार ठढवू शकतात.

डॉ. मयुरा काळे, जनरल फिजिशियन, औरंगाबाद म्हणतात की, प्लास्टिक बॉटल कोणत्याही प्रकाराची असो, ती पर्यावरणासाठी आणि मानवी जीवनासाठी हानिकारक आहे. प्लास्टिक बॉटल हे आपत्कालीन परिस्थितीत किंवा सिंगल यूजसाठी आहे. मात्र, आजकाल याचा सर्रास वापर सुरू आहे. सर्वजण प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी साठवू लागल्याने ते आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहे.

  • वारंवार प्लास्टिक बॉटलमधून पाणी पिल्याने त्यामधील डोळ्यांना न दिसणाऱ्या हानिकारक रसायनांव्यतिरिक्त, बॅक्टेरिया, प्लास्टिक फ्लोराइड, आर्सेनिक आणि अल्युमिनियमसारखे विषारी पदार्थ शरीरात जातात.

  • प्लास्टिक बॉटलमधील मायक्रो फायवर्स, घातक बायफेनिल-ए (बीपीए) केमिकल्स निघतात, ते पाण्याद्वारे पोटात जातात, त्याचे आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ

  • या विषारी पदार्थांमुळे आतड्यांचे, पोटांचे विकार उद्भवतात. याशिवाय रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो.

  • प्लास्टिक बॉटलमधील घातक केमिकल्समुळे मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, पोटाचे आजार होण्याचा धोका संभवतो.

  • कार किंवा बाइकमध्ये ठेवलेली प्लास्टिकची बॉटल सूर्यप्रकाशामुळे गरम होते. त्यातील घातक केमिकल्स पाण्यात विरघळतात, जे शरीरासाठी अपायकारक असतात.

प्लास्टिक हे पर्यावरण (Environment) आणि आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे प्लास्टिक बॉटल, जारमध्ये पाणी साठवणे आणि वारंवार ते पाणी (Water) पिणे यामुळे अनेक आजार उद्धभवू शकतात. त्यामुळे आजार होऊ द्यायचे नसतील तर पाणी पिण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा ग्लास वापरावा. प्लास्टिक बॉटल उघडल्यानंतर लगेच संपवून, डिस्पोज करावी. प्लास्टिक बॉटल वन टाइम यूज कराल तरच शरीरात जाणारे हे स्लो पॉयझन आपण रोखू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT