Drinking Water
Drinking Water  Saam Tv
लाईफस्टाईल

Drinking Water : ब्रश न करता पाणी पिताय ? फायदे की, नुकसान; जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

कोमल दामुद्रे

Drinking Water : पूर्वीच्या काळी आपली आज्जी-आई ही रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी जमवायची व सकाळी उठल्यानंतर ते पाणी घरातील सर्व माणसांना पिण्यास द्यायची. त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव केला जायचा. परंतु, बदलेल्या काळानुसार अनेक गोष्टी बदलत गेल्या आहेत.

हल्ली सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात प्रथम काय करतो तर तो ब्रश. यानंतर आपण आपल्या दैनंदिन कामे करायला तयार असतो पण, आपल्यापैकी बहुतेक लोक झोपेतून उठल्यानंतर ग्लासभर तरी पाणी पितात. त्यानंतर आपल्याला कामाला लागतात.

सकाळी रिकाम्या पोटी कोमट किंवा साधे पाणी प्यावे? असे बरेचदा आपल्या सांगितले जाते. पण आपण पाणी का प्यावे, यामागील सत्य जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? आज आमच्या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ब्रश न करता पाणी प्यावे की नाही? पाणी प्यायल्याने दिवसभर हायड्रेट राहते. यासोबतच पोटही चांगले राहते आणि तुमची त्वचा दिवसभर चमकते.

डॉक्टरांच्या मते, दिवसभरात 10-12 ग्लास पाणी प्यावे. ब्रश न करताही ते फायदेशीर आहे, असे अनेकांचे मत आहे. या प्रश्नावर संशोधन काय सांगतं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

ब्रश न करता पाणी पिणे कितपत फायदेशीर आहे?

1. तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात

Bacteria

ब्रश न करता पाणी प्यायल्याने पचनशक्ती वाढते असे अनेक वृद्धांचे मत आहे. याशिवाय तोंडात आढळणारे बॅक्टेरियाही जमा होण्यापूर्वीच नष्ट होतात.

2. प्रतिकारशक्ती वाढवते

Digestive Health

सकाळी दात न घासता रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.त्यामुळे सर्दी होण्याचा धोका कमी होतो. ज्या लोकांना लगेच सर्दी होते, त्यांनी ब्रश न करता रिकाम्या पोटी पाणी (Water) नक्कीच प्यावे.

3. चमकदार त्वचा

Skin Benefits

चमकदार त्वचेसाठी तुम्ही ब्रश न करता रिकाम्या पोटी नक्कीच पाणी प्यावे. यामुळे तुमची त्वचा दिवसभर चमकते. यासोबतच तोंडात फोड येणे, आंबट ढेकर येणे, बद्धकोष्ठता अशा पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

4. मधुमेह (Diabetes)

Diabetes

उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्यांनी सकाळी लवकर रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी प्यावे. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने वजनही नियंत्रणात राहते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

SCROLL FOR NEXT