Drinking black coffee daily liver health SAAM TV
लाईफस्टाईल

Black coffee: दररोजची ब्लॅक कॉफी तुमच्या लिव्हरसाठी ठरते फायदेशीर…पण एका अटीवर! तज्ज्ञांनी केले मोठे खुलासे

Drinking black coffee daily liver health: दररोज ब्लॅक कॉफी पिणे यकृतासाठी फायदेशीर आहे, पण ती साखर किंवा दूध न घालता प्यायली गेली पाहिजे. योग्य प्रमाणात घेतल्यास ती यकृताचे संरक्षण करते आणि दीर्घकालीन आरोग्य फायदे देते.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्यापैकी अनेकजण सकाळी किंवा संध्याकाळी ब्लॅक कॉफी पिण्यावर भर देतात. दुधाच्या कॉफीपेक्षा ब्लॅक कॉफी ही आरोग्यासाठी चांगली मानली जाते. याशिवाय ब्लॅक कॉफी ही तुमच्या लिव्हरसाठीही चांगली असते असं म्हटलं जातं. मात्र यामध्ये किती तथ्य आहे.

ब्लॅक कॉफी लिव्हरसाठी चांगली असते, हे खरं आहे का? सध्याचे संशोधन काय सांगते? साखर न घातलेल्या ब्लॅक कॉफीचं सेवन केल्याने लिव्हरचं आरोग्य चांगलं राहतं, याबाबत अनेक संशोधनांमध्ये सातत्यपूर्ण निरीक्षण आढळले आहे.

मुंबई सेंट्रलच्या वॉकहार्ट हॉस्पिटलमधील कन्सल्टंट - लिव्हर ट्रान्सप्लांट व गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जन डॉ. स्वप्निल शर्मा यांच्या मते, काही विशिष्ट गटांमध्ये ब्लॅक कॉफी घेतल्याने क्रॉनिक लिव्हर डिसीज, फॅटी लिव्हर, लिव्हर फायब्रोसिस आणि लिव्हर कॅन्सर यांचा धोका कमी होण्यास मदत होते. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, क्लोरोजेनिक ॲसिड्स आणि इन्फ्लामेशन कमी करणारे घटक असतात. हे घटक लिव्हरमधील पेशींची दुरुस्ती करण्याची क्षमता वाढवतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कॉफी शरीरासाठी काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते, मात्र ती कोणत्याही आजाराचा उपचार असू शकत नाही. ज्यांना आधीपासून यकृताशी संबंधित समस्या आहेत, त्यांच्यासाठी कॉफी औषधोपचार किंवा आवश्यक जीवनशैलीतील बदलांची जागा घेऊ शकत नाही.

किती प्रमाणात कॉफी सुरक्षित किंवा फायद्याची मानली जाते?

बहुतेक संशोधनानुसार दररोज २–३ कप ब्लॅक कॉफी हे योग्य आणि फायदेशीर प्रमाण मानले जाते. यापेक्षा जास्त घेतल्यास काही लोकांमध्ये आम्लपित्त, झोपेचा त्रास, हार्ट बीट वाढणं किंवा चिंता वाढणं यासारखे त्रास उद्भवू शकतात.

अनियंत्रित उच्च रक्तदाब, तीव्र आम्लपित्त, हृदयाच्या गतीतील अनियमितता किंवा कॅफिनची जास्त संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींनी कॉफीचं प्रमाण डॉक्टरांशी सल्लामसलत करून निश्चित केलं पाहिजे. सामान्य लोकांसाठी, मर्यादित प्रमाणातील ब्लॅक कॉफी सुरक्षित आहे.

काळी कॉफी फॅटी लिव्हरवर मदत करते का?

या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. पण ब्लॅक कॉफी एकटी पुरेशी नाही. कॉफीमुळे यकृतातील इन्फ्लामेशन कमी होण्यास मदत होतं आणि सामान्य फॅटी लिव्हरपासून फायब्रोसिसकडे होणारी प्रगती मंदावू शकते.

फॅटी लिव्हरची समस्या खालील गोष्टींनी सुधारते

  • वजन कमी करणे

  • नियमित व्यायाम

  • साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट कमी करणे

  • मद्यपानावर नियंत्रण

  • मधुमेह व कोलेस्ट्रॉलचं मॅनेजमेंट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी

India Religious Places : भारतातील या ७ पवित्र धार्मिक स्थळांना एकदा नक्की भेट द्या

Lado Laxmi Yojana: या राज्यातील महिलांच्या खात्यावर खटाखट येणार ₹६३००; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Pune: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती गठीत, शरद पवारांच्या संस्थेचं होणार ऑडिट

Grey Hair Causes: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात? नॅचरली पद्धतीने केस काळे करण्यासाठी भन्नाट टिप्स

SCROLL FOR NEXT