Cholesterol Control saam tv
लाईफस्टाईल

Cholesterol Control: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दररोज प्या या 2 मसाल्यांचं पाणी? साचलेली चरबी झटक्यात वितळेल

High cholesterol: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी अर्जुनाची साल आणि दालचिनीचे पाणी किती फायदेशीर आहे? हे पाणी बनवण्याची पद्धत, संभाव्य आरोग्यदायी फायदे आणि आवश्यक काळजी जाणून घ्या. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे महत्त्वही समजून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना कोलेस्ट्रॉल वाढण्याचा त्रास होतो. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. अशा वेळी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेणं आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणं महत्त्वाचं असतं.

याशिवाय काही घरगुती उपायही केले जातात. अर्जुनाच्या झाडाची साल आणि दालचिनी यांचं पाणी पिणं हा त्यापैकी एक उपाय आहे. मात्र या पाण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं याचे ठोस पुरावे मर्यादित आहेत. त्यामुळे हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

अर्जुनाची साल आणि दालचिनीचं पाणी कसं बनवायचं?

हे पाणी बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा चमचा अर्जुनाच्या झाडाची साल, थोडीशी दालचिनी आणि एक ग्लास पाणी लागणार आहे. हे साहित्य वापरून घरच्या घरी पाणी तयार करता येतं.

  • पाणी बनवण्याची सोपी पद्धत

  • सर्वप्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या

  • हे पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा

  • पाणी गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा अर्जुनाची साल आणि थोडीशी दालचिनी घाला

  • हे पाणी चांगलं उकळू द्या

  • पाणी उकळून अर्धं झाल्यानंतर गॅस बंद करा

  • तयार झालेलं पाणी गाळून घ्या

  • हे पाणी चहाप्रमाणे पिऊ शकता

मात्र अर्जुनाची साल आणि दालचिनी यांचं पाणी नियमित पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्ही कोलेस्ट्रॉल किंवा इतर आजारांसाठी औषधं घेत असाल तर अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.

हृदयाच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर?

अर्जुनाच्या झाडाच्या सालीमध्ये काही उपयुक्त वनस्पती घटक आढळतात. दालचिनीमध्येही अँटिऑक्सिडंट गुणधर्म असलेले घटक असतात. हे घटक शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करू शकतात.

त्यामुळे अर्जुनाची साल आणि दालचिनी यांचा वापर हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, असं मानलं जातं. काही अभ्यासांमध्ये या घटकांच्या संभाव्य फायद्यांचा विचार करण्यात आला आहे. मात्र, हे पाणी प्यायल्याने बॅड कोलेस्ट्रॉल नक्की कमी होतं किंवा हृदयविकाराचा धोका कमी होतो, असं ठामपणे सांगण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणं, नियमित व्यायाम करणं, तळलेले आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ कमी खाणं आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घेणं महत्त्वाचं आहे.

पचनाच्या समस्यांमध्येही होऊ शकतो फायदा?

दालचिनीचा वापर अनेक घरांमध्ये मसाला म्हणून केला जातो. काही लोक पचनाशी संबंधित त्रास कमी करण्यासाठीही तिचा वापर करतात. अर्जुनाची साल आणि दालचिनी यांचं पाणी प्यायल्याने पचन सुधारतं, असा दावा केला जातो.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Chimney: किचन चिमणीचा फिल्टर किती दिवसांनी स्वच्छ करावा?

Maharashtra News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी ठाण्यात होणाऱ्या ठाणे पोलिसांनी सर्वपक्षीय आंदोलनाची परवानगी नाकारली

MLC Election Result: विधान परिषदेच्या ५ जागांचा अंतिम निकाल जाहीर, मविआ ३ तर महायुतीला २ जागांवर यश; कुठे कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय?

Famous Actor : मुलगी झाली हो! प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, फोटो शेअर करत दाखवली बाळाची पहिली झलक

Ration Card : पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांचे मोफत धान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

SCROLL FOR NEXT