Drink ORS in summer; The body will never be dehydrated...
Drink ORS in summer; The body will never be dehydrated... Saam TV
लाईफस्टाईल

Oral Rehydration Solutions: उन्हाळ्यात 'ओआरएस' प्या; शरीरात कधीच होणार नाही पाण्याची कमी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शरीरात पाण्याची कमतरता झाली की, अशक्तपणा, चक्कर येण किंवा डायरीया सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे शरीरातली पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेला फॉर्मुला 'ओरल रिहाइड्रेशन सोल्यूशन' (ORS) पिणं नेहमीच फायदेशीर आहे. लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच हे पेय फायदेशीर आहे. (Drink ORS in summer; The body will never be dehydrated...)

हे देखील पहा -

उन्हाळा (Summer) सुरु झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात तर तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. शरीरात पाण्याची कमतरता होणं म्हणजे शरीर डिहायड्रेट (Dehydration) होणं. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी, शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ओआरएस घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ओआरएसची पावडर मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होते. पण काही कारणांमुळे जर ओआरएस पावडर उपलब्ध झाली नाही तर घरच्या घरीही स्वयंपाकघरातील किरकोळ सामग्रीतून ओआरएस बनवता येते.

घरच्या घरी ओआरएस कसं बनवाल? (How do I prepare an ORS solution at home?)

घरीच जर ओआरएस बनवायचे झाले तर एक लिटर स्वच्छ पिण्याच्या पाण्यात (Purified Water) सहा चमचे साखर (Sugar) व अर्धा चमचा मीठ (Salt) टाकून बनवावे. त्याची चव अश्रू एवढी खारट असायला पाहिजे. साखर जास्त झाली तर डायरिया वाढू शकतो त्यामुळे हे प्रमाण योग्य असावं.

ओआरएसचे फायदे:

1) चक्कर, ग्लाणीसाठी ओआरएस फायदेशीर

२) पोटदुखी, हगवणीसाठी फायदेशीर

३) अशक्तपणासाठी फायदेशी

ORS सेवन करण्याआधी ही काळजी घ्या (Safety about ORS Intake)

१) ओआरएस बनवताना, पॅकेटवर दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे नक्कीच पालन करा.

२) योग्य प्रमाणात पाणी मिसळा.

३) ORS द्रावण २४ तासांपेक्षा जास्त ठेवू नये. कारण त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात.

४) ओआरएस पावडरमध्ये दूषित पाणी मिसळू नका. तुम्ही प्रथम पाणी उकळा आणि नंतर थंड करून ओआरएस द्रावण तयार करा.

५) ओआरएस फक्त पाण्यात मिसळा. यासाठी दूध, सूप, ज्यूस, शीतपेय वापरू नका.

अशाप्रकारे साखर, मीठ आणि शुद्ध पाणी वापरुन घरच्या घरी ओआरएस बनवून शरीरातील पाण्याची कमतरता दूर करु शकता आणि ताजेतवाने राहू शकता.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur News: बैलगाडा घाटात कौटुंबीक वाद, तुफान हाणामारीत तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Today's Marathi News Live: देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे; निलेश लंके

Prajakta Mali : "वादळापूर्वीची शांतता..."; प्राजक्ता माळी असं का म्हणतेय ?

Rashid Khan Six: पैज लावा, असा शॉट पाहिलाच नसेल! राशिदने खेचला 'स्नेक स्टाईल' षटकार

Skin Care: चेहऱ्यावर साबण लावताय?होऊ शकतात या गंभीर समस्या

SCROLL FOR NEXT