Holi Hai! मुंबई पोलिसांची सुरेल धूळवड... (पहा Video)

Mumbai Police Holi Special Band: मुंबई पोलिसांच्या बॅन्ड पथकाचं खाकी स्टुडिओ (Khaki Studio) या नावानं यूट्यूबर चॅनेल आहे.
Mumbai Police Play Rang Barase Song On Band At Holi Occasion
Mumbai Police Play Rang Barase Song On Band At Holi OccasionTwitter/@MumbaiPolice

मुंबई: देशासह राज्यभरात होळीच्या निमित्तानं उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनाची रुग्णसंख्याही कमी झाल्यानं यंदा होळी (Holi Festival) आणि धूळवड जोशात साजरी होत आहे. अशात मुंबई पोलिसांनाही (Mumbai Police) होळीचा रंग चढला आहे, पण खाकी वर्दीला कोणत्याही रंगाचा डाग न लागू देता मुंबई पोलिसांनी धूळवड साजरी केली आहे. ही धूळवड सुरेल मैफिलीच्या स्वरुपात बॅन्ड (Band) वाजवत साजरी केली गेली. मुंबई पोलिसांच्या अंतर्गत असलेल्या मुंबई पोलिस बॅन्ड पथकानं (Mumbai Police Band Squad) 'रंग बरसे भीगे चुनरवाली...' या गाण्यावर बॅन्ड वाजवत सुरेली धूळवड साजरी केली. (Rang Barse | Khaki Studio | Holi Special | Mumbai Police Band)

हे देखील पहा -

यात ड्रम, सॅक्सोफोन, ट्रम्पेट, बासरी अशा अनेक वाद्यांच्या समावेश करत 'रंग बरसे भीगे चुनरवाली...' गाण्याचं बॅन्ड व्हर्जन तयार करण्यात आलं. मुंबई पोलिसांच्या बॅन्ड पथकाचं खाकी स्टुडिओ (Khaki Studio) या नावानं यूट्यूबर चॅनेल आहे. काही खासप्रसंगी या बॅन्ड पथकाकडून बॅन्ड वाजवत जनतेला शुभेच्छा, संदेश दिले जातात. याआधीही मुंबई पोलिसांच्या बॅन्ड पथकाने लतादीदींचं ऐ मेरे वतन के लोगो, मनी हाईस्ट मधलं बेला चाव, मेरे सपनों की राणी, जय हो, जय - जय महाराष्ट्र माझा, जेम्स बॉन्ड थीम अशी अनेक गाणी हे बॅन्डच्या स्वरुपात सादर केली आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com