Hair Care Tips Saam TV
लाईफस्टाईल

Hair Care Tips: केसांना कंडिशनर लावताना 'या' चूका करू नका; अन्यथा पडेल टक्कल

Applying Hair Conditioner Tips : कंडिशनर फक्त 1 मिनिट केसांत ठेवतात आणि लगेच केस धुवून टाकायचे असतात. कंडिशनरच्या जास्त किंवा चुकच्या वापराने आपल्या केसांवर त्याचा वाईट परिणाम होतो.

Ruchika Jadhav

राज्यात सध्या मे महिन्याचा कडक उन्हाळा सुरू आहे. गरमिने सर्वांच्याच अंगाची लाहीलाही झाली आहे. उकाड्यापासून वाचण्यासाठी नागरिक विविध उपाय करत आहेत. अशात अनेक मुली केस जाड आणि मोठे असल्याने दररोज हेअरवॉश करतात. तसेच कंडिशनर लावतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का कंडिशनरच्या जास्त किंवा चुकच्या वापराने आपल्या केसांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे आज याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

स्कॅल्पवर लावू नये

जर तुम्ही स्कॅल्पवर कंडिशनर लावत असाल तर असे केल्याने केस आणखी गळू शकतात. केसांची पकड असलेल्या ठिकाणी कंडिशनर लावूनये. कंडिशनर नेहमी केसांपासून 10 सेंटिमीटर अंतरावरून लावण्यास सुरुवात करावी.

आवश्यकता पाहून घ्या

प्रत्येक गोष्ट आवश्यकतेनुसार केली पाहिजे. काही मुली केस जास्त शयनी आणि सिल्की व्हावेत म्हणून कंडिशनर लावतात. मात्र जास्त प्रमाणात कंडिशनर लावल्याने केस आणखी खराब होतात. तसेच अर्ध्यातून तुटून जातात.

वेळेवर लक्ष द्या

काही मुलींना कंडिशनर लावण्याची पद्धत वेळ समजत नाही. जास्त चांगला रिझल्ट मिळणार असं समजून त्या खूप वेळ कंडिशनर आपल्या केसांत ठेवतात. मात्र कंडिशनर फक्त 1 मिनिट केसांत ठेवतात आणि लगेच केस धुवून टाकायचे असतात. असे न केल्याने देखील केस गळती वाढते.

नॅचरल प्रोटेक्ट वापरा

बाजारात अनेक प्रकारचे कंडिशनर ब्रँड आहेत. प्रत्येक ब्रँड नुसार वेगवेगळे प्रोडक्ट मिळते. अशावेळी तुमचे केस कोणत्या प्रकारचे आहे हे समजून नॅचरल गोष्टींपासून बनलेलं कंडिशनर वापरलं पाहिजे.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. चांगल्या आणि स्मूथ केसांसाठी साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT