Toxic Relationship Saam Tv
लाईफस्टाईल

Toxic Relationship : तुमचा पार्टनर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत रोखठोक करतो? कसे ओळखाल टॉक्सिक रिलेशनशीप?

How To Know Toxic Relationship : तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुम्हाला यातून बाहेर कसे पडायचे हे समजत नसेल, तर तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष देऊन त्या ओळखता आल्या पाहिजे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Relationship Tips : मागील वर्षी दिल्लीमधील झालेल्या श्रद्धा हत्याकांडाच्या बातमीने सगळ्यांचे हृदय हलावून टाकले होते. अशातच पुन्हा श्रद्धा मर्डर केस सारखा आणखीन एक विषय समोर आला आहे. आता घडलेल्या या घटनेमध्ये साहिल नावाच्या एका मुलाने त्याची गर्लफ्रेंड निक्की यादव हीची निर्दयीपणे हत्या केली आणि तीच्या शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये लपवून ठेवले. हत्या केल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी साहिलने बहादूरगढ येथील एका गावामध्ये राहणाऱ्या मुलीबरोबर लग्न केले.

तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये (Relationship) असाल आणि तुम्हाला यातून बाहेर कसे पडायचे हे समजत नसेल, तर तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष देऊन त्या ओळखता आल्या पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी दिसत असतील, ज्या तुम्ही याआधी कधीही नोटीस केल्या नाही आहेत.

तर, या गोष्टी ओळखून तुम्ही लवकरात लवकर त्या नात्यामधून (Relation) बाहेर पडले पाहिजे. वेळ आणि गोष्ट हाताबाहेर निघून जाण्याआधी तुम्ही सावधान होणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या नात्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी दिसत असतील तर, तुम्ही लवकरात लवकर यामधून बाहेर पडले पाहिजे.

लक्षणे -

1. नात्याच्या सुरुवातीला तुमच्यासोबत जरा जास्तच चांगला स्वभाव ठेवणे.

2. आपली अशी इमेज बनवणे की समोरच्याला तुमच्याबद्दल खेद किंवा दुःख वाटेल.

3. स्वतःची चूक कधीही मान्य न करणे.

4. वारंवार तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणे.

5. तुमच्या घरच्यांसमोर किंवा मित्र - मैत्रिणी समोर तमाशा करणे.

6. नेहमी तुमच्या फोनची आणि बॅगची झडती घेणे.

7. तुमच्यावर संशय घेणे.

8. तुमचे ईमेल, फेसबुक, व्हॉट्सअप आणि फोन रेकॉर्डस् चेक करणे.

9. जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्यावर लक्ष ठेवून असेल, तेव्हा तुम्ही समजून जा की, तुमचे रीलेशनशीप टॉक्सिक झाले आहे.

वाईट वागणुकीची परिभाषा -

शारीरिक शोषण -

नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मारणे, धक्का देने, थोबाडीत मारणे, लाथ मारणे किंवा कोणत्याही प्रकारचे शारिरक शोषण नसावे. जर असे असेल तर ही सामान्य गोष्ट नाही आहे.

दुसऱ्या पद्धतीचे शोषण -

फक्त मारणे झोडणे म्हणजे शोषण नव्हे, जर तुम्ही तुमच्या पार्टनरला घाबरत असाल, आणि भयभीत असा अनुभव घेत असाल तर, याचा अर्थ असा होतो की तुम्ही भावनात्मक आणि मनोवैज्ञानिक दूरव्यवहाराचा अनुभव घेत आहात.

टॉक्सिक रिलेशनशीपमधून बाहेर कसे पडावे -

1. तुमचे नाते टॉक्सिक म्हणजेच विषारी झाले असेल तर, या नात्यामध्ये गुंतू नका. उलट बाहेर कसे पडता येईल याकडे लक्ष द्या. सोबतच कोणत्याही प्रकारच्या कारणामुळे जस की, प्रेम आणि इगोमुळे स्वताला नात्यामधून बाहेर येण्यापासून थांबवू नका.

2. जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुमचे नाते कोणत्याही काउंसलर किंवा अन्य व्यक्तीच्या मदतीने सुधारू शकते तर, मदत घेण्यासाठी मागे पुढे पाहू नका.

3. स्वतःवर प्रेम करायला शिका आणि तुमच्या आत्मसन्मानासोबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. कोणत्याच व्यक्तीला हा हकक नाही आहे की, तो तुमच्यासोबत हवं तस वागेल आणि बोलेल.

4. मनापासून नात तुटणे, बदनामी होणे आणि एखाद्या व्यक्तीने तुम्हाला न स्वीकारणे या गोष्टींची भीती तुमच्या मनाधून काढून टाका. टॉक्सिक नात्यांमधून बाहेर आल्यानंतर असा विचार करा की, तुम्ही या नात्यामधून बाहेर आल्यावर तुमचे आउष्य सुंदर होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT