Bike Stop Suddenly While Riding Saam Tv
लाईफस्टाईल

Bike Care Tips : भररस्त्यात बाईक अचानक बंद पडते का ? अशावेळी काय कराल ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bike Stop Suddenly While Riding : प्रत्येक दुचाकीस्वाराला बाईकच्या भागांबद्दल थोडी माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून ते रस्त्यातच अडकले तर त्यांना त्या त्रासाला सहज सामोरे जावे लागेल. अनेकवेळा असे देखील घडते की, बाईक चालवताना अचानक थांबते आणि पुन्हा पुन्हा सुरू करूनही ती सुरू होत नाही. जर तुमच्यासोबत असे घडले तर काय करावे याबद्दल आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून सांगणार आहोत.

इंधन तपासणी -

तुमच्यासोबत असे कधी घडले तर सर्वप्रथम तुमच्या मोटरसायकलचे इंधन (Fuel) संपले आहे की नाही ते तपासा. जर असे होत नसेल तर तुम्ही स्पार्क प्लग एकदा तपासावा, कारण बहुतेक प्रकरणांमध्ये लूज स्पार्क प्लगमुळे बाईक (Bike) सुरू होत नाही.

स्पार्क प्लग म्हणजे काय?

बाईकच्या इंजिनच्या वरच्या बाजूला पांढरा रंगाचा स्पार्क प्लग देण्यात येतो. जे अनेक वेळा सैल असताना, इंजिनला पूर्णपणे कनेक्शन देऊ शकत नाही आणि बाईक सुरू होत नाही.

त्यामुळे तुमची बाईक सुरू होत नसेल तर सर्वप्रथम स्पार्क प्लग काढा आणि कापडाने स्वच्छ (Clean) करा आणि नीट बसवा. त्यानंतर तुम्ही बाईक एकदा स्टार्ट करून तपासू शकता.

बरेचदा असे घडते की लोक (People) बाईक बंद करण्यासाठी इंजिन स्वीच वापरतात आणि विसरतात. नंतर पुन्हा मोटारसायकल स्टार्ट करयला गेल्यावर ती सुरू होत नाही आणि वारंवार किक किंवा सेल्फ मारून स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतात. जर तुमची बाईक सुरू होत नसेल तर एकदा बाजूला लाल रंगात दिलेला इंजिन स्विच तपासा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT