Nightmares in AC Room saam tv
लाईफस्टाईल

Nightmares in AC Room: खरंच एसी लावून झोपल्यास भयानक स्वप्न पडतात? डॉक्टरांनी सांगितलं वैज्ञानिक कारण

AC and nightmares scientific reason: काही लोकांना एसीमध्ये झोपल्याने वाईट किंवा भयानक स्वप्ने (Nightmares) पडण्याचा अनुभव येतो. हा केवळ एक योगायोग आहे की यामागे काही वैज्ञानिक कारण आहे? या प्रश्नाचे उत्तर एका डॉक्टरने दिले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • एसीमध्ये झोपताना भितीदायक स्वप्नं पडू शकतात.

  • खोलीत ऑक्सिजनची कमतरता स्वप्नांवर परिणाम करते.

  • अति थंड वातावरण झोपेची गुणवत्ता बिघडवते.

आजकाल बहुतेक लोकांना आरामात झोपायचं असेल तर ते एसीचा वापर करतात. थंडगार हवा झोप पटकन आणि छान लागते. पण अनेकदा लोक अशी तक्रार करतात की, एसीमध्ये झोपल्यावर विचित्र किंवा भितीदायक स्वप्नं पडतात. मग प्रश्न पडतो की खरंच एसी आणि भयानक स्वप्नांचा काही संबंध आहे का?

डॉ. योगेश शर्मा सांगतात की, आपली झोप ही थेट आपल्या शरीराच्या तापमानावर आणि आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असते. एसीमुळे खोलीचं तापमान खाली येतं आणि त्यामुळे झोप पटकन लागते. पण जर तापमान खूपच कमी झालं, तर शरीर अस्वस्थ होतं आणि मेंदूवर परिणाम होतो. याचा थेट परिणाम "रेपिड आय मूव्हमेंट" या अवस्थेवर होतो, जी अवस्था म्हणजेच आपण स्वप्नं पाहतो ती वेळ असते.

एसीमध्ये झोपल्यावर जास्त भितीदायक स्वप्नं का पडतात?

थंड हवा आणि ऑक्सिजनची कमतरता

पूर्णपणे बंद खोलीत एसी सुरू ठेवल्यावर ताजी हवा आत-बाहेर फिरत नाही. त्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि झोपेत विचित्र किंवा भितीदायक स्वप्नं पडतात.

तापमानातील चढ-उतार

शरीर खूप गार झालं तर मेंदूला त्रास होतो आणि झोपेची गुणवत्ता बिघडते. त्यामुळे निगेटिव्ह स्वप्नं पडू शकतात.

मानसिक थकवा आणि ताण

एसीमुळे शरीर आरामशीर होतं, पण जर मनात आधीपासूनच ताण असेल तर थंड वातावरण मिळून मेंदू भितीदायक स्वप्नं निर्माण करू शकतो.

नेहमी एसीलाच दोष द्यावा का?

डॉ. शर्मा सांगतात की, प्रत्येक वेळी वाईट स्वप्नं पडण्यामागे एसीच कारणीभूत नसतो. कधी कधी सततचा ताण, नैराश्य, झोपण्यापूर्वी मोबाइलवर वेळ घालवणं किंवा जड जेवण करणं हेसुद्धा मोठं कारण ठरतं. पण जर तुम्हाला रोजच एसीमध्ये झोपताना अशा स्वप्नांचा त्रास होत असेल, तर वातावरण हा एक महत्त्वाचा घटक असू शकतो.

चांगली झोप हवी असेल तर डॉक्टरांच्या टिप्स

  • एसीचं तापमान साधारण 26 डिग्रीवर ठेवा.

  • झोपताना खोलीत थोडीशी तरी हवा खेळती राहील याची काळजी घ्या.

  • रात्री जड जेवण किंवा कॅफीन टाळा.

  • झोपण्याआधी हलकं म्युझिक ऐका, ध्यान करा किंवा पुस्तक वाचण्याची सवय लावा.

एसीमध्ये भितीदायक स्वप्नं का पडतात?

थंड वातावरण, ऑक्सिजनची कमतरता आणि मेंदूवरील परिणामामुळे भितीदायक स्वप्नं पडतात.

एसीचे आदर्श तापमान किती असावे?

एसीचे आदर्श तापमान साधारण २६ डिग्री सेल्सिअस असावे.

बंद खोलीत एसी सुरू ठेवणे का हानिकारक आहे?

ताजी हवा न फिरल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासते आणि मेंदूवर परिणाम होतो.

वाईट स्वप्नांमागील इतर कारणे कोणती?

मानसिक ताण, जड जेवण, मोबाइलचा वापर आणि नैराश्य ही इतर कारणे आहेत

चांगली झोप मिळवण्यासाठी काय करावे?

हलकं जेवण, ध्यान, म्युझिक आणि खेळत्या हवेची व्यवस्था ठेवावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महापालिका निवडणुकांसाठी दोन पक्षांची युती, एकत्र लढणार, पुढच्या बैठकीत ठरणार प्लान

Maharashtra Politics: गणपती दर्शनाआधी एकनाथ शिंदे–राज ठाकरे यांची बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा|VIDEO

Maharashtra Live News Update: उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानींचा आत्महत्येचा प्रयत्न

Maharashtra Government: राज्यातील शिक्षकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, टप्पा अनुदानाला मंजुरी

Mithila Palkar: मिथिला पालकरच्या सौंदर्याची जादू, साडीतील फोटोंनी केले घायाळ

SCROLL FOR NEXT