Running for Better Heart Health and Blood Pressure Control साम टीव्ही मराठी
लाईफस्टाईल

Heart Health : रनिंग केल्याने बीपी झटक्यात कमी होतो? आठवड्याला किती मिनिटे पळायला हवे? जाणून घ्या

Does Running Lower Blood Pressure : हाय बीपीचा त्रास आहे? नियमित धावणे, चालणे आणि व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. आठवड्यातून १५० मिनिटांचा व्यायाम कसा फायदेशीर ठरतो, जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

How Many Minutes Should You Run Daily : आजकाल बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हाय बीपीचा म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास अनेकांना जाणवतो. बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त औषधांवर अवलंबून न राहता रोजच्या सवयींमध्ये बदल करणेही तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी कोणताही खर्च न लागणारा आणि सोपा पर्याय म्हणजे रोज पळणे. पण, पळण्याने खरोखरच बीपी नियंत्रणात राहतो का? आठवड्यातून किती वेळ पळायला हवे? कोणी डॉक्टरांचा सल्ला आधी घ्यावा? याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

उच्च रक्तदाब म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दाब सतत जास्त राहणे. दीर्घकाळ असा दाब राहिल्यास हृदयावर ताण पडतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अनेकांना वाटते की रक्तदाब फक्त गोळ्या-औषधांनीच आटोक्यात येतो, पण तसे नाही. रोजच्या सवयींचाही यावर मोठा परिणाम होतो. आहार, पुरेशी झोप, तणावमुक्ती आणि व्यायाम या सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश असतो. यासाठी अनेक जण धावण्याचा पर्याय निवडतात. यासाठी कोणताही वेगळा खर्च येत नाही आणि खास साधनांचीही गरज नसते.

नियमित धावण्यामुळे रक्तदाब (BP) नियंत्रणात राहण्यास कशी मदत होते, याबाबत केआयएमएस हॉस्पिटल्स, महादेवापुरा येथील इंटर्नल मेडिसिनचे प्रमुख प्रा. डॉ. एस. एम. फयाज यांनी सांगितलेय. धावणे ही हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगली सवय असल्याचे ते म्हणालेत. नेमका काय फायदा होतो, जाणून घेऊयात..

  • शांत बसलेले असतानाही हृदय एका ठोक्यात जास्त रक्त पंप करू शकते, ज्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो.

  • धावताना रक्तवाहिन्यांच्या भिंतींतून नायट्रिक ऑक्साईड नावाचा वायू तयार होतो. त्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि रक्ताचा दाब कमी होतो.

  • व्यायामामुळे शरीरातील ताण-तणावाची ('लढा किंवा पळा' ही) प्रतिक्रिया कमी होते आणि रक्तवाहिन्या ताठ न राहता मोकळ्या राहतात.

  • वजन कमी राहिल्यास हृदयावर पडणारा अतिरिक्त भार कमी होतो.

  • धावताना क्षणिक बीपी वाढणे स्वाभाविक आहे, पण त्यानंतर काही तासांसाठी रक्तदाबाची पातळी खाली येऊन आराम मिळतो.

रक्तदाबात ४ ते ५ mmHg (म्हणजेच रक्तदाब मोजण्याचे एकक) इतकी जरी घट झाली तरी ती थोडी वाटू शकते. पण मोठ्या प्रमाणावर विचार केल्यास यामुळे हृदयविकाराचा झटका अथवा स्ट्रोक येण्याचा धोका खूप कमी होतो, असे प्रा. डॉ. फयाझ यांनी सांगितले.

'ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन'मध्ये २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका मोठ्या अभ्यासात १५ हजार ८२७ लोकांच्या २७० चाचण्यांचा अभ्यास करण्यात आला. यातून अनेक गोष्टी समोर आल्या. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम केल्याने शांत बसलेल्या अवस्थेतील रक्तदाब सुधारतो आणि बीपी कमी करण्यासाठी एकट्या धावण्याचाही मोठा फायदा होतो.

धावण्यासारख्या व्यायामामुळे बीपीचा वरचा आकडा सरासरी ४.४९ mmHg ने कमी होतो आणि खालचा आकडा २.५३ mmHg ने कमी होतो. तर हालचाल न करता स्नायूंवर ताण देऊन करायचा व्यायामामुळे (उदा. भिंतीला टेकून बसणे - वॉल सिट). वरचा बीपी सरासरी ८.२४ mmHg ने आणि खालचा बीपी ४.०० mmHg ने कमी झाल्याचे दिसून आले.

किती धावले पाहिजे?

आठवड्यातून जवळपास १५० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करण्याचे ठरवा. अशा गतीने धावा की तुम्ही छोटी वाक्ये बोलू शकाल, असे प्राध्यापक फयाझ यांनी सांगितले आहे. आठवड्यातून ५ दिवस ३० मिनिटे धावा. धावण्याची इच्छा नसेल तर जलद गतीने चालण्यास सुरुवात करा. मध्ये मध्ये थोडा वेळ जॉगिंग करा. जलद चालणे आणि सायकलिंग करणे देखील फायदेशीर आहे. आठवड्यातून दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश करा. सुरक्षितपणे धावण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी प्राध्यापक फयाज यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्य आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांशी बोलल्याशिवाय औषधे घेणे थांबवू नका किंवा कमी करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence : ५ वेळा वाहतूक नियम मोडला तर ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पाहा सविस्तर

कोथिंबीर आठवडाभर ताजी कशी ठेवायची?

Gold Rate Today : दोन दिवसांची घसरण संपली! सुवर्णनगरीत आज सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ

Health Tips : किडनी स्टोनचा धोका वाढवतात रोजच्या 'या' ७ सवयी; वेळीच सावध व्हा, अन्यथा...

Maharashtra News Live Update: पुणे शहर आणि जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था याबाबत पालकमंत्री यांच्याकडून आढावा

SCROLL FOR NEXT