Uterus removal surgery saam tv
लाईफस्टाईल

Uterus removal surgery: गर्भाशय काढून टाकल्यानंतर मासिक पाळी येते का? याचा मासिक पाळीवर कसा होतो परिणाम?

How does menstruation affect: गर्भाशयाशी संबंधित समस्यांबद्दल माहिती नसल्यामुळे अनेक वेळा महिलांच्या मनात असा प्रश्न पडतो की गर्भाशय काढून टाकल्यानंतर मासिक पाळी येऊ का?

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरात असलेल्या अवयवाचं वेगळं महत्त्व आहे. कधीकधी काही महिलांना गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयाचा विस्तार, अनियमित किंवा जास्त रक्तस्त्राव, गर्भाशयाचा कॅन्सर यांसारख्या काही आरोग्य समस्यांमुळे गर्भाशय काढून टाकण्याची समस्या उद्भवते. गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेला हिस्टेरेक्टॉमी म्हणतात.

हिस्टेरेक्टॉमी या प्रक्रियेनंतर, महिलेच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल होऊ लागतात. गर्भाशयाशी संबंधित समस्यांबद्दल माहिती नसल्यामुळे अनेक वेळा महिलांच्या मनात असा प्रश्न पडतो की गर्भाशय काढून टाकल्यानंतर मासिक पाळी येऊ का? आज या आर्टिकलच्या माध्यमातून आपण महिलांच्या मनात असलेल्या या प्रश्नांचं उत्तर देणार आहोत.

गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळी येते का?

यापूर्वी केलेल्या अभ्यासांमधून असं समोर आलं आहे की, गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) बाहेर पडतं तेव्हा मासिक पाळी येतं. त्यामुळे ज्यावेळी गर्भाशय काढलं जातं तेव्हा ही प्रक्रिया पूर्णपणे थांबते. याचाच अर्थ जर संपूर्ण हिस्टेरेक्टॉमी केली गेली असेल तर मासिक पाळी येणार नाही.

दुसरीकडे जर फक्त गर्भाशय काढून टाकलं आणि अंडाशय जतन केलं तर शरीरात हार्मोनल क्रिया चालू राहते. यामुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स तयार होत राहतात. परंतु या स्थितीत गर्भाशय नसेल, परिणामी मासिक पाळी येणार नाही.

हिस्टेरेक्टॉमीचा प्रकार आणि त्याचा मासिक पाळीवर होणारा परिणाम

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिस्टेरेक्टॉमीचे प्रकार विविध असतात. जे शस्त्रक्रियेनंतर मासिक पाळी येईल की नाही हे ठरवतात.

टोटल हिस्टेरेक्टॉमी (Total Hysterectomy):

या प्रक्रियेत संपूर्ण गर्भाशय आणि गर्भाशय काढून टाकलं जातं. या स्थितीत महिलांची मासिक पाळी पूर्णपणे थांबते.

सबटोटल किंवा पार्टियल हिस्टेरेक्टॉमी (Subtotal or Partial Hysterectomy):

यामध्ये, गर्भाशयाचा फक्त वरचा भाग काढला जातो, तर गर्भाशयाची ग्रीवा ठेवली जाते. जर अंडाशय देखील ठीक असतील तर हार्मोनल बदल होतात आणि काही महिलांना हलका रक्तस्त्राव होऊ शकतो.

रॅडिकल हिस्टेरेक्टॉमी (Radical Hysterectomy):

यामध्ये गर्भाशय, गर्भाशय ग्रीवा, फॅलोपियन नलिका, आजूबाजूच्या पेशी ऊतक आणि कधीकधी अंडाशय काढून टाकलं जातं. तर या प्रकरणातही महिलांची मासिक पाळी पूर्णपणे थांबते.

काही महिलांना हिस्टेरेक्टॉमीनंतर हलका रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होण्याची शक्यता असते. जो सहसा शस्त्रक्रियेनंतर काही आठवडे राहू शकतो. परंतु जर रक्तस्त्राव जास्त होत असेल किंवा इतर असामान्य लक्षणं दिसू लागली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

Fact Check: तुमच्या कॉफीमध्ये झुरळाची पावडर, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

BMC Election : मोठी बातमी! राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका कधी होणार? महत्वाची माहिती समोर

डोंबिवलीत मोठा राडा! दोन महिला गटांमध्ये वाद, फेरीवाल्या महिलेने अंगावर पेट्रोल ओतले अन्...

Sangram Jagtap: राष्ट्रवादीत 'संग्राम', अजित पवारांना 'ताप' जगतापांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच

SCROLL FOR NEXT