लाईफस्टाईल

Sudden arm weakness: सकाळी उठल्यानंतर शरीराची एक बाजू काम करणं बंद होतंय? शरीरातील या बदलाकडे दुर्लक्ष करू नका!

Wake-up stroke symptoms: रात्री झोपेत स्ट्रोक आल्यास त्याची लक्षणे सकाळी उठल्यानंतर दिसू शकतात. हातात अशक्तपणा, चेहरा वाकडा होणे किंवा बोलताना अडचण येणे ही धोक्याची चिन्हे आहेत. वेक-अप स्ट्रोक म्हणजे काय, त्याचे उपचार कोणते आणि लक्षणे दिसल्यास काय करावे, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

रात्री झोपताना व्यक्ती अगदी व्यवस्थित असते मात्र, सकाळी उठल्यानंतर अचानक एक हात वर उचलता येत नाही, चेहरा एका बाजूला वाकलेला दिसतो किंवा बोलताना अडचण येते. अशी लक्षणं दिसल्यास घाबरून जाणं स्वाभाविक आहे. मात्र ही लक्षणं स्ट्रोकची असू शकतात. झोपेत असताना स्ट्रोक आला आणि त्याची लक्षणं सकाळी उठल्यानंतर दिसली तर त्याला 'वेक-अप स्ट्रोक' (Wake-Up Stroke) असं म्हणतात.

जयपूरमधील नारायणा हॉस्पिटलचे कन्सल्टंट न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरी तज्ज्ञ डॉ. वैभव माथूर यांच्या मते, स्ट्रोकच्या उपचारांमध्ये तो नेमका कधी सुरू झाला हे समजणं खूप महत्त्वाचं असतं. मात्र वेक-अप स्ट्रोकमध्ये हीच गोष्ट डॉक्टरांसाठी आव्हान ठरतं. कारण रुग्ण झोपेत असताना स्ट्रोक आलेला असतो. त्यामुळे तो नेमका कोणत्या वेळी सुरू झाला, हे सांगणे कठीण होते.

झोपेत असतानाही स्ट्रोक येऊ शकतो का?

होय, झोपेत असतानाही स्ट्रोक येऊ शकतो. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो. ही घटना झोपेत घडल्यास रुग्णाला त्याची लक्षणं जागं झाल्यानंतरच जाणवतात.

अशा वेळी डॉक्टर रुग्णाला शेवटचं कधी पाहिलं तेव्हा त्याची प्रकृती सामान्य होती, याची माहिती घेतात. वैद्यकीय भाषेत याला 'लास्ट नोन वेल' (Last Known Well) असे म्हणतात. स्ट्रोकच्या उपचारांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरते.

सकाळी स्ट्रोकची लक्षणं दिसल्यास उपचाराची वेळ निघून जाते का?

सकाळी उठल्यानंतर स्ट्रोकची लक्षणं दिसली म्हणजे उपचाराची वेळ निघून गेली आहे, असं नाही. डॉ. माथूर यांनी सांगितलं की, मेंदूतील रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे स्ट्रोक आल्यास काही रुग्णांना ही गुठळी विरघळवणारे औषध देता येतात. या उपचाराला 'थ्रोम्बोलिसिस' (Thrombolysis) असं म्हणतात.

सामान्य परिस्थितीत या उपचारासाठी पात्र असलेल्या रुग्णांना लक्षणं सुरू झाल्यानंतर साडेचार तासांच्या आत औषध देणं हा उपचाराचा ठरलेला निकष आहे. मात्र वेक-अप स्ट्रोकमध्ये लक्षणं नेमकी कधी सुरू झाली, हे माहीत नसतं. त्यामुळे अशा रुग्णांवर उपचार करताना विशेष काळजी घ्यावी लागते. काही रुग्ण रुग्णालयात पोहोचेपर्यंत उपचाराची नेहमीची वेळ निघून गेलेली असते. अशा वेळी स्कॅनच्या अहवालानुसार योग्य ठरणाऱ्या निवडक रुग्णांना गुठळी विरघळवणारी औषधं देता येऊ शकतात.

याशिवाय, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या मोठ्या रक्तवाहिनीत गुठळी अडकली असेल तर ती बाहेर काढण्यासाठी 'मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी' (Mechanical Thrombectomy) हा उपचार केला जाऊ शकतो. या प्रक्रियेत काही उपकरणांच्या मदतीने रक्तवाहिनीतील गुठळी काढली जाते. योग्य रुग्णांमध्ये स्ट्रोकची लक्षणं सुरू झाल्यापासून २४ तासांपर्यंतही हा उपचार उपयोगी ठरू शकतो.

मात्र हे उपचार प्रत्येक रुग्णाला देता येत नाहीत. रुग्णाची प्रकृती, तपासण्यांचे अहवाल आणि मेंदूची स्थिती पाहूनच डॉक्टर उपचाराचा निर्णय घेतात.

सकाळी उठल्यानंतर अशी लक्षणे दिसल्यास काय करावं?

सकाळी झोपेतून उठल्यानंतर अचानक शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा जाणवणं, चेहरा वाकडा होणं, बोलताना अडचण येणं किंवा शरीराचा तोल जाणं, अशी लक्षणं दिसल्यास अजिबात वेळ घालवू नका. तातडीने वैद्यकीय मदत घ्या आणि रुग्णाला जवळच्या रुग्णालयातील आपत्कालीन विभागात घेऊन जा.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mountain Climbers: वजन कमी करण्यासाठी करा फक्त हा एक व्यायाम; संपूर्ण शरीराचा होईल कार्डिओ, मिळतील अनेक फायदे

Maharashtra News Live Update: नागपुरातील २० वॉशिंग सेंटरवर पिण्याच्या पाण्याने धुतली जातात वाहने

Copper water benefits: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेल्या कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय आहे तांब्याच्या भांड्यातील पाणी, दिवसातून फक्त 'या' वेळी प्या

Maharashtra Fort : स्वराज्याच्या स्वप्नाचा जन्म जिथे झाला, 'तो' ऐतिहासिक किल्ला प्रत्येक मराठी माणसाने एकदा नक्की पाहावा!

Election: मोठी बातमी! दुष्काळामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT