Does Salad Burn Belly Fat
Does Salad Burn Belly Fat Saam tv
लाईफस्टाईल

Does Salad Burn Belly Fat : खरचं की काय ? सलाद खाल्ल्याने वजन होते कमी ? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Weight Loss Tips : अनेकदा आपण वजन कमी करण्यासाठी डायटियशयनचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतो. अशावेळी आपल्याला अनेकदा डॉक्टर हेल्दी खाण्यास सांगतात. वजन कमी करण्यासाठी आपण आहारात बरेच असे अन्नपदार्थ खाणे टाळतो ज्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहाते. परंतु, या सगळ्यात जो पदार्थ प्रामुख्याने आपल्या ताटाच्या डाव्या बाजूला आढळतो तो सलाद.

सलाद हे आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. यामुळेच बहुतेक लोकांना त्यांच्या मुख्य जेवणासोबत कोशिंबीर खायला नक्कीच आवडते. वजन कमी करण्यासाठी सलाद हा देखील चांगला पर्याय मानला जातो. अनेकदा लोक फक्त वजन कमी करण्यासाठी सलाद खातात, पण ते योग्य आहे का?

फक्त सलाद (Salad) खाऊन वजन कमी करता येते का? जर तुमचाही हा प्रश्न असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की फक्त सलाद खाऊन वजन कमी करता येत नाही. कोशिंबीर खाण्याची ही योग्य पद्धत आहे आणि जर तुम्ही तुमच्या प्रमुख जेवणाऐवजी फक्त सॅलड खाल्ले तर त्यामुळे तुमचे वजन कमी होणार नाही. असे मत रिद्धिमा बत्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबतची माहिती शेअर केली आहे.

1. सलाद खाऊन वजन कमी करता येईल ?

सलाद खाऊन कधीच वजन कमी होतं नाही. अनहेल्दी फूडऐवजी सलाद खायला सुरुवात केली तर नक्कीच वजन कमी (Weight Loss) होण्यास मदत होईल. परंतु, हा वजन कमी करण्याचा सोप्पा मार्ग जरी असला तरी आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. जेवणापूर्वी सलाद खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होईल. परंतु, जेवण वगळल्यास सलादवर अवलंबून राहाणे शरीरासाठी नुकसानदायक ठरु शकते. यामुळे गॅस, ब्लोटिंग, अपचन आणि आम्लपित्ताची समस्या होऊ शकते. यामुळे इतर समस्या उद्भवू शकतात.

  • फक्त सलाद खाल्ल्याने आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो तसेच शरीरात पोषणाची कमतरता जाणवू शकते.

  • दिवसभर फक्त सॅलड खाल्ल्याने तुमची लालसा वाढू शकते. बर्‍याच वेळा आपण या लालसेवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि अनावश्यकपणे खातो.

  • फक्त सॅलड खाल्ल्याने शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे स्नायू गळणे, केस गळणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

2. सलाद खाण्याची योग्य पद्धत कोणती ?

  • जेवणाचा समतोल राखण्यासाठी सलाद आवश्यक आहे. त्यासाठी आहारात कांदा, टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर राजमा-भात बरोबर संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही खाऊ शकता.

  • तुम्ही निरोगी आणि पौष्टिकतेने भरलेले सलाद बाऊल देखील बनवू शकता. यामध्ये अनेक कडधान्ये, प्रथिने, हिरव्या पालेभाज्याचा समावेश करु शकतो.

  • जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर कोणत्याही एका पदार्थावर अवलंबून राहू नका. आहारात प्रथिने, फायबर आणि कर्बोदकांचे योग्य संतुलन असले पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT