Myth And Facts About Drinking Water saam tv
लाईफस्टाईल

Drinking Water : उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघ्यांच्या समस्या उद्भवतात? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

Myth And Facts About Drinking Water : डॉक्टर आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाण्याची कमतरता निर्माण झाली तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. पण उभं राहून पाणी प्यायल्यास संधिवाताचा त्रास होतो का?

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. शरीरात पाण्याची कमतरता होऊ द्यायची नाही, असं म्हटलं जातं. आपल्या शरीरासाठी पाणी खूप महत्त्वाचं असतं. पाणी हे आपल्या शरीरातील एक मूलभूत गरजांपैकी एक आहे. जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.

डॉक्टर देखील आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र यावेळी नेहमी बसून पाणी प्यावं असंही डॉक्टर सांगतात. अनेक वेळा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की, उभं राहून पाणी पिऊ नये. असं पाणी प्यायल्यास ते थेट तुमच्या गुडघ्यापर्यंत जाऊ शकते ज्यामुळे तुम्ही संधिवाताचा त्रास होऊ शकतो. पण हे खरं आहे का?

माहिमच्या एस.एल रहेजा रूग्णालयातील Internal Medicine कंसल्टंट डॉ. डॉ निखिल कुलकर्णी यांनी सांगितलं की, पाणी आपल्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित करण्यास मदत होते. याशिवाय पेशींना आवश्यक पोषक मिळतात आणि शरीराला कचरा बाहेर काढण्यास मदत करते. एखाद्याने किती पाणी प्यावे हे हवामानाच्या परिस्थितीवर आणि त्यांच्या क्रियाकलापांच्या पातळीवर अवलंबून असतं.

डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले की, एक जुनी गोष्ट आहे जी चुकीचं सांगते की, एखाद्याने उभं असताना पाणी पिऊ नये. कारण त्यामुळे संधिवाताचा त्रास होतो. मुळात या दाव्याचं समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. संधिवात प्रामुख्याने आपण ज्या स्थितीत पाणी पितात त्याऐवजी आनुवंशिकता, वय आणि सांधेदुखीच्या दुखापतींसारख्या कारणांमुळे होतो. पाणी संपूर्ण शरीरात फिरते आणि त्यामुळे त्याला कोणतीही हानी होत नाही.

उभं राहून पाणी पिणं कितपत योग्य?

लोकांमध्ये असा गैरसमज आहे की, जर एखाद्या व्यक्तीने उभं राहून पाणी प्यायल्यास ते गुडघ्यामध्ये जाऊ शततं. आहारतज्ज्ञांच्या मते, पाणी प्यायल्यानंतर ते अन्ननलिकेमध्ये जाऊन आणि नंतर पोटात जातं. शरीरात असा वेगळा मार्ग नाही की ज्याद्वारे पाणी थेट गुडघ्यापर्यंत जाईल आणि तुम्हाला संधिवाताचा त्रास होईल.

किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रौढांनी दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायलं पाहिजे. साडेतीन लिटरपेक्षा जास्त पाणी पिणं शरीरासाठी योग्य नाही. जर कोणी खेळाडू किंवा एथलीट असेल तर त्यांच्या बाबतीत पिण्याच्या पाण्याचे निकष वेगळे असू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT