Male Infertility saam tv
लाईफस्टाईल

Male Infertility: मधुमेह वाढवतो पुरुष वंध्यत्वाचा धोका? शुक्राणूंच्या आरोग्यावर होणारे परिणाम समजून घ्या

diabetes male infertility sperm health effects: मधुमेहामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. यामुळे शुक्राणूंच्या पेशींमध्ये नुकसान होते. तसेच, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित न राहिल्यास टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर परिणाम होतो, ज्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होते.

Surabhi Jayashree Jagdish

अनियंत्रित मधुमेह हा शुक्राणूंची गुणवत्ता, लैंगिक कार्य आणि हार्मोन संतुलनावर परिणाम करतो आणि एकूणच पुरुषांच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम करतो. पुरुषांनी आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहावं आणि मधुमेहाचं योग्य ते व्यवस्थापन करावं. मधुमेह योग्य प्रकारे नियंत्रणात ठेवला नाही तर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

देशात मधुमेहाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. पुरुष आणि महिला या दोघांचाही यात समावेश आहे. अनेक पुरुषांना कल्पनाही नसते की, मधुमेह त्यांच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम करु शकतो. अनेक पुरुषांना अनियंत्रित मधुमेहाची समस्या असते जे रिप्रोडक्शन समस्यांना कारणीभूत ठरतो.

अंधेरीतील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. प्राजक्ता चौधरी यांनी सांगितलं की, मधुमेह हा पुरुषांमधील सर्वात सामान्य जीवनशैलीतील आजारांपैकी एक आहे. जेव्हा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढून मधुमेह होतो.

काय लक्षणं दिसून येतात?

खुप तहान लागणं, वारंवार लघवी होणं, थकवा येणं, दृष्टी कमकुवत होणं आणि जखमा बऱ्या होण्यास वेळ लागणं ही लक्षणं दिसतात. कालांतराने मधुमेहाचं योग्य व्यवस्थापन न झाल्यास त्यामुळे नसा, रक्तवाहिन्या, किडनी, डोळे आणि प्रजनन अवयवांचं नुकसान होऊ शकतं. मधुमेहाचा संबंध शुक्राणूंच्या आरोग्याशी असून अनियंत्रित मधुमेहामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन, टेस्टोस्टेरॉन कमी होणं आणि शुक्राणूंच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

मधुमेहाचा शुक्राणूंच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. रक्तातील उच्च साखरेची पातळी शुक्राणूंच्या पेशींमधील डीएनएला नुकसान पोहोचवू शकतं, ज्यामुळे स्त्रीबीजांचे फलन करण्याची त्यांची क्षमता कमी होते. अनियंत्रित मधुमेहाच्या ऑक्सिडेटिव्ह ताणामुळे मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते, शुक्राणूंची हालचाल मंदावते आणि शुक्राणूंचा आकारही असामान्य असल्याचं दिसून येते.

मधुमेहामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आणि नसा कमकुवत होतात. यामुळे लिंगाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि ताठरपणा कमी होतो आणि त्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या येते. परिणामी गर्भधारणेची शक्यता कमी होते. मधुमेहामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडतं म्हणजेच टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होते. यामुळे पालकत्वाची इच्छा बाळगणाऱ्या पुरुषांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

शुक्राणूंच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी महत्वाचे उपाय

  • रक्तातील साखरेच्या पातळीचं नियमितपणे निरीक्षण करा आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार, ते नियंत्रणात ठेवा.

  • तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे औषधं घ्या, दररोज किमान ४५ मिनिटं व्यायाम करा, योगा आणि ध्यानधारणा करून ताण कमी करा, वजन नियंत्रित राखा, संतुलित आहाराचे सेवन करा, धूम्रपान आणि मद्यपान टाळा

  • गर्भधारणेस प्रयत्न करत असल्यास हार्मोन आणि वीर्य विश्लेषणासह नियमित आरोग्य तपासणी करायला विसरु नका.

मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन न केल्यास पुरुषाच्या शुक्राणूंची गुणवत्ता खालावणं, हार्मोनल असंतुलन आणि लैंगिक कार्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. मात्र रक्तातील साखरेचे योग्य नियंत्रण करुन पुरुषांना त्यांच्या शुक्राणूंचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

अनियंत्रित मधुमेह असलेल्या पुरुषांसाठी प्रजनन उपचार रक्तातील साखरचे नियंत्रण सुधारणं, हार्मोन्सचं संतुलन राखणं आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेनुसार इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI) किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या सहाय्यक प्रजनन तंत्रांचा वापर करणं तसंच शुक्राणूंची संख्या किंवा इरेक्टाइल डिसफंक्शन सारख्या समस्यांवर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, १० तोळे सोनं ७१०० रुपयांनी वाढले, २२ -२४ कॅरेटचा आजचा भाव किती?

Leopard Attack : आई- बाबांसोबत शेकोटी घेत होता; दबा धरून बसलेल्या बिबट्याने अलगद उचलून नेला; ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Bigg Boss Marathi Reunion Party : 'बिग बॉस मराठी'ची रंगली रियुनियन पार्टी; भन्नाट गाण्यावर थिरकले कलाकार, पाहा VIDEO

Blood Pressure कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा? अनुभवी डॉक्टरांनी दिल्या ४ महत्वाच्या टिप्स, लगेचच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT