AC Health Risks freepik
लाईफस्टाईल

AC Health Risks: ८-१० तास AC मध्ये राहता? जाणून घ्या कोणते धोके संभवतात

Stay Hydrated: तज्ज्ञ सांगतात की एसी हवेतील आर्द्रता कमी करतो, त्यामुळे हवामान कोरडे होते आणि यामुळे त्वचा, डोळे व श्वसनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Dhanshri Shintre

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या तीव्र उष्णतेची लाट जाणवते आहे, काही ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार नौतापाच्या काळात तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचू शकते. अशा हवामानात सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक आहे. एसीचा वापर हा उष्णतेपासून बचाव करण्याचा एक प्रभावी मार्ग मानला जातो, मात्र त्याचा अतिरेक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. एसी सतत वापरल्यास त्वचा, डोळे आणि श्वसनाशी संबंधित त्रास उद्भवू शकतात.

उन्हाळ्यात एसी मुळे दिलासा मिळतो, मात्र दिवसभर त्यात राहिल्यास शरीरावर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञ सांगतात की एसी हवेतील आर्द्रता कमी करतो, त्यामुळे वातावरण कोरडे बनते. याचा परिणाम त्वचा, डोळे आणि श्वसनावर होतो. अशा कोरड्या हवामानात दीर्घकाळ राहिल्यास आरोग्य समस्या वाढू शकतात, विशेषतः जे आधीपासून त्रस्त आहेत त्यांच्यासाठी धोका अधिक वाढतो.

उन्हाळ्यात एसी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त असतो, पण त्याचा दीर्घकाळ वापर त्वचा आणि डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतो. कोरड्या हवामुळे त्वचा आणि डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढतो. जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थच्या अहवालानुसार, अशा वातावरणात राहिल्यास त्वचेतील ओलावा ३०-४०% कमी होतो. त्यामुळे त्वचेला खाज, जळजळ आणि डोळ्यांना ड्रायनेससारख्या त्रासांची शक्यता वाढते.

कृत्रिम थंड हवेमुळे शरीराचे नैसर्गिक तापमान संतुलन बिघडते, ज्यामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि डोकेदुखी, थकवा जाणवू शकतो. मायग्रेन असणाऱ्यांसाठी ही स्थिती अधिक त्रासदायक ठरू शकते. तसेच, कोरड्या वातावरणात जास्त वेळ राहिल्यास दमा व ब्राँकायटिससारख्या श्वसन समस्यांचा धोका वाढतो. एसी स्वच्छ न ठेवल्यास त्यात बुरशी, धूळ आणि जंतू साठतात, ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण होऊ शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT