Trekking Place
Trekking Place Saam Tv
लाईफस्टाईल

Trekking Place : ट्रेकिंग करायला आवडते ? तर, दिल्लीजवळील 'या' 4 ठिकाणांना नक्की भेट द्या!

कोमल दामुद्रे

New Delhi Trekking Place : काही लोकांना एडवेंचर करायला खूप आवडते त्यामुळे त्यांना संधी मिळेल तेव्हा ते त्यांच्या फॅमिली सोबत किंवा मित्रांसोबत ट्रेकिंगचा प्लान करतात. जर वीकेंडला ट्रेकिंगचा प्लान करत असाल तर राजधानी दिल्लीजवळील अप्रतिम अशा काही ट्रेकिंग ठिकाणांना भेट देऊ शकता.

हा अनुभव तुमच्यासाठी नक्कीच अविस्मरणीय असू शकेल. तसेच जर आपल्या इथे ट्रेकिंग करण्यासाठी भरपूर प्रसिद्ध ठिकाण आहेत पण ते एक्सप्लोर करायला खूप वेळ (Time) लागू शकतो त्यामुळे तुमच्या विकेंडप्लॅन अगदी तुमच्या वेळेत होईल असे काही ठिकाण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. नाग टिब्बा ट्रॅक (उत्तराखंड)

नाग टिब्बा हे ठिकाण उत्तराखंड येथील टिहरी गढवाल या जिल्ह्यात स्थित आहे. स्मुद्रसपाटीपासून 10000 फूट उंचीवर, देवदाराच्या घनदाट जंगलातून जाणारे हे ठिकाण दिल्लीपासून 474किलोमिटर अंतरावर आहे. या ट्रेकिंगचा अनुभव घेताना तुम्हाला केदारनाथ शिखर आणि गंगोत्री शिखराचे सुंदर दृश्य पाहता येईल.

2. चक्रात ट्रॅक (उत्तराखंड)

हे ठिकाण उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे स्थित आहे.चक्रात ट्रॅकला भेट देण्यासाठी तुम्हाला दिल्लीवरून 332किलोमीटर अंतर गाठावे लागेल. चक्रता ट्रॅकला जाणारा यमुना आणि टोन्स नदीच्या दरम्यान तुम्हाला सुंदर हिल स्टेशन अनुभवायला मिळणे. तिथून हिमालय पर्वताचे दृश्य अतिशय विहंगम आहे.

3. त्रिउंड ट्रॅक ( हिमाचल )

फ्रेंडस सोबत किंवा फॅमिली सोबत हे ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे.हे ठिकाण हिमाचल येथील कांगडा येथे स्थित आहे. दिल्लीपासून त्रिउंड ट्रॅक 474किलोमिटर अंतरावर आहे. ट्रेकिंग (Trekking) दरम्यान तुम्हाला बर्फाच्या चादरीने झाकलेले डोंगर अनुभवायला मिळेल आणि कांगडा घाटाचे दृष्य पहायला मिळेल.

4 केदारकांठा (उत्तराखंड)

केदारकांठा हे ठिकाण उत्तराखंड येथील उत्तरकाशी येथे स्थित आहे.केदारकांठा ट्रॅकला भेट देण्यासाठी तुम्हाला दिल्लीवरून 428 किलोमीटर अंतर पार करावे लागेल. हे ठिकाण येथील शांततापूर्ण वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.केदारकांठा ट्रॅकचा आणि कॅम्पिंगचा अनुभव घेण्यासाठी खूप सुंदर ठिकाण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांना होणार अटक?, दिल्ली कोर्टाने लैंगिक छळ प्रकरणातील आरोप केले निश्चित

Today's Marathi News Live : पहिल्यांदा निर्यातीवर 40% कर लावला, निर्यात बंद केली: जयंत पाटलांचा आरोप

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; कायम जामीन अर्ज मंजूर

Sonal Chauhan: ब्लॅक ड्रेसमध्ये बोल्डनेसचा कहर, 'जन्नत गर्ल'ने उडवली झोप

Sonakshi Sinha : हीरामंडीतल्या फरीदानच्या दिलखेचक अदा, पाहा सोनाक्षी सिन्हाचा लूक

SCROLL FOR NEXT