History of Tea Yandex
लाईफस्टाईल

History of Tea: 'चहा' भारतात कधी आणि कसा पोहोचला तुम्हाला माहिती आहे का?

History of Tea News: बहुतेक लोकांची दिवसाची सुरूवात चहा पिल्याने होते. दुधासोबत साखर, आले आणि वेलची यांसारखे मसाले मिसळून तयार केलेल्या या स्वादिष्ट चहाचा सुगंध लोकांना वेड लावतो. पण तुम्हाला माहित आहे का, चहाचा शोध विचार करून नाही तर चुकून झाला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काही जणांची दिवसाची सुरुवात गरम कप चहा शिवाय अपूर्ण राहते. घरून निघताना एक कप चहा, ऑफिसला पोहोचल्यावर एक कप आणि मग संध्याकाळी थकवा घालवण्यासाठी 'चहा' प्रत्येक क्षणी चहा हवा असतो.

भारतीय चहाची चव इतकी अनोखी आहे की तिचे शब्दात वर्णन करता येणार नाही. हे फक्त एक पेय नाही तर स्वतःचा अनुभव आहे. आजकाल भारतीय मसाला चहा जगभर प्रसिद्ध झाला आहे. अनेक देशांमध्ये, "चाय" या शब्दाचा अर्थ भारतीय शैलीतील चहा असा होतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतात चहाची लोकप्रियता तितकी जुनी नाही. काही दशकांपूर्वीपर्यंत अनेक भारतीयांनी चहाही चाखला नव्हता. ब्रिटीश राजवटीत चहा भारतात आला आणि तेव्हापासून त्यात अनेक बदल झाले. आज तो भारतीय चहाच्या नावाने जगभर ओळखला जातो.

चुकून चहाचा शोध लागला

चहाचा इतिहास ब्रिटनशी नसून चीनशी जोडलेला आहे. असे मानले जाते की, चहाचा शोध इ.स.पूर्व २७३२ मध्ये चिनी शासक शेंग नुंग याने अज्ञात प्रयोगादरम्यान लावला होता. असे म्हणतात की, त्याने चुकून एका जंगली वनस्पतीची पाने उकळत्या पाण्यात टाकली आणि अचानक त्याला एक अद्भुत सुगंध जाणवला. पाण्याचा रंगही बदलला होता. उत्सुकतेपोटी त्याने हे पेय वापरून पाहिले आणि ते इतके आवडले की तो नियमितपणे पिऊ लागला.

भारतातील चहाचा इतिहास ब्रिटिशांपेक्षा जुना

इंग्रजांच्या आगमनानंतर भारतात चहाचे आगमन झाले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या आधीही भारतात १२०० ते १६०० च्या दरम्यान चहा प्यायला जात होता.आसाम सारख्या ईशान्येकडील राज्यात चहा जंगलात पिकत असे. सिंगफो आदिवासी समुदायासह इतर अनेक आदिवासी गटांनी हा जंगली चहा आरोग्याच्या फायद्यासाठी पित असे.

भारतातील औद्योगिक चहा उत्पादनाचा इतिहास

ब्रिटिश साम्राज्य आणि चीन यांच्यातील संघर्षाशी जोडलेला आहे. चीनसोबतच्या चहाच्या व्यापारात अडथळे आल्याने ब्रिटिशांनी आसामच्या जंगलात चहाची लागवड सुरू केली. सुरुवातीला, बहुतेक भारतीय चहा निर्यातीसाठी उत्पादित केला जात असे आणि देशांतर्गत बाजारात फारसा वापर केला जात नसे. तथापि, २० व्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या जागतिक आर्थिक मंदीमुळे चहा उत्पादकांना देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करावे लागले. जाहिरातींच्या माध्यमातून चहाची लोकप्रियता वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि हळूहळू भारतीयांना चहा पिण्याची सवय लागली.

चहाला नवी चव

भारतीयांनी चहा बनवण्याचा वेगळ्या पद्धती बनवतात. चहाची पाने उकळत्या पाण्यात टाकण्यापेक्षा थेट पाण्यात किंवा दुधात उकळतात. दूध आणि साखर मिसळण्याची पद्धत त्यांनी इंग्रजांकडून नक्कीच शिकून घेतली, पण भारतीयांनी त्यात स्वतःचे बदल केले.

Edited by - Archana Chavan

WhatsApp Account: आता एक WhatsApp अकाउंट चार डिव्हाइसवर चालेल, करा 'या' काही सोप्या ट्रिक्स

Cyclone Alert : भयंकर चक्रीवादळाचं सावट! 110 किमी वेगात हवा तांडव घालणार, IMD चा गंभीर इशारा, भारतावरही संकट?

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Shreyas Iyer : टीम इंडियाला मोठा धक्का, उपकर्णधार गंभीर जखमी, ३ आठवडे संघाबाहेर

Avocado Sandwich Recipe : सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी ॲव्होकॅडो सँडविच, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

SCROLL FOR NEXT