Heel Pains
Heel Pains  Saam Tv
लाईफस्टाईल

Heel Pains : हिवाळ्यात तुमच्याही टाचा दूखतायत? 'हे' घरगुती उपाय करून पहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Heel Pains : हाय हिल्स घालणे,जास्ती चालणे,खूप वेळ उभे राहणे,प्रवास करताना लोकल ट्रेन मध्ये तासन तास उभे राहणे यामुळे पाय आणि टाचा खूप जास्ती दुखतात म्हणून लोक पेनकिलरचा वापर करून ह्या वेदना थांबवतात.टाचदुखी मुळे चालणे फिरणे कमी होते कुठेही जायचं असल की आपण रिक्षा,गाडी,बाईक चा वापर करतो.

शरीराची अजिबात हालचाल होऊ देत नाही त्यामुळे वजन (Weight) वाढते आणि अजून इतर आजारांना निमंत्रण मिळते. टाचदुखीचे एक कारण म्हणजे शरीराला हवे असलेले पोषकतत्व मिळत नसल्याने ह्या समस्या उद्भवू शकतात.

काही वेळेस तुमच्या टाचात कॅल्शियम (Calcium) जमा होऊन त्याचा दुखायला लागतात. त्यामुळे पोषकतत्व मिळणाऱ्या गोष्टीचा समावेश आहारात केला पाहिजे. चला तर मग पाहूया टाचदुखी वर करून काही घरगुती उपाय.

तेलाची मालिश -

टाचदुखी पासून आराम मिळवण्यासाठी तेल मालिश हा एक साधा सोपा उपाय आहे.खोबरेल तेल, मोहरीच्या तेलाचा वापर करून तुम्ही टाचाची मालिश करू शकता त्याने मस्लस रिलॅक्स होतात आणि रक्तप्रवाहातील अडथळा दूर होतो.दिवसातून 3/4 वेळा रोज 10/15 मिनटे तेल मालिश केल्याने टाचदुखी दूर होते.

मिठ आणि पाणी -

एका भाड्यात गरम गरम पाण्यात मीठ टाकून त्यात टाचा बुडवून ठेवा तुम्हाला सहन होईल एवढे गरम पाणी घ्या.मीठाच्या गरम पाण्यात पाय टाकताच तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेन. 15/20 मिनिट असेच त्या भाड्यात पाय टाकून ठेवा त्यानंतर साध्या पाण्याने टाचा स्वच्छ करून घेयायच्या.

हळदीचा वापर -

हळद जरी खाण्यासाठी वापरत असलो तरी हळदीचे अनेक औषधी गुण आहेत.कर्क्युमिन या तत्वामुळे दुखणे, सुजन,जखम लगेच दूर होते. कोणाला काही लागले जखम झाली की अगोदर हळद लावतात त्यामुळे जिथे लागले आहे तिथून रक्त येणे थांबते. ग्लास भर गरम दुधात हळद टाकून पील्याने टाचदुखी पासून आराम मिळेल आणि इतर कोणता आजार असलेला ही बरा होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil On Election Campaign | सभांना गर्दी कशी होते? जयंत पाटील काय म्हणाले?

Palak Tiwari: श्वेताच्या लेकीचं ट्रेडिशनल सौंदर्य; चाहते घायाळ!

Today's Marathi News Live : जेपी गावित माघार घेणार की निवडणूक लढवणार? उद्या होणार निर्णय

Bald Benefits: जबरदस्त! टक्कल करण्याचे फायदेच फायदे

Perfume Hacks: परफ्यूम जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT