Phantom Vibration Syndrome Saam Tv
लाईफस्टाईल

Phantom Vibration Syndrome: मोबाईल वाजल्याचा भास होतोय, सारखा-सारखा मोबाईल पाहताय? तुम्हाला असू शकतो हा गंभीर आजार

Side Effects of Mobile Phones: तुम्हाला सातत्याने मोबाईलची रिंग वाजल्याचा भास होतोय का? तुमचा मोबाईलवर नोटीफिकेशन आलंय असं वाटतं आणि तुम्ही मोबाईल चेक करता. पण नोटीफिकेशन आलेली नसते, असं का होतं? हा गंभीर आजार तर नाही ना? जाणून घ्या...

सायली खांडेकर

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

तुम्ही चालत आहात आणि खिशात मोबाईल व्हायब्रेट झाल्यासारखा वाटतो आणि तुम्ही मोबाईल काढून पाहता. पण मोबाईलवर ना कॉल आलेला असतो ना मेसेज, हे सगळं तुमच्यासोबत घडत असेल तर सावधान! कारण हे फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम या गंभीर मानसिक आजाराचं लक्षण असल्याचा दावा तज्ज्ञांनी केलाय..

सध्या मोबाईल काळाची गरज बनलीय. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईल हवा आहे. शिक्षणापासून ते मनोरंजनापर्यंत आणि खरेदीपासून ते व्यवसायापर्यंत अनेक गोष्टींसाठी मोबाईलचा वापर केला जातो. यातूनच अनेकांना सतत मोबाईल चेक करण्याची सवय लागलीय. मात्र याच सवयीचे झोप उडवणारे दुष्परीणाम समोर आलेत.

मोबाईलधारकांमध्ये फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमचं प्रमाण आढळून आलं आहे. 100 मोबाईलधारकांपैकी 11 जण या गंभीर आजाराने हैराण झालेत. 20 ते 30 वयोगटातील सर्वाधिक लोकांना फोनचं व्यसन आहे. 40 वर्षे वयोगटातील लोकांचाही यात समावेश अधिक आहे. व्हॉट्सअप, इन्स्टाग्रामसारखे मेसेजिंग अॅपवर वेळ घालवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. त्यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सुचवलेत ते जाणून घेऊ...

फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमवरचे उपाय

  • फोनचा वापर कमी करा.

  • स्क्रीन टाईम सेट करा.

  • फोनचं नोटीफिकेशन बंद करा आणि रिंग टोन बदला.

  • मित्रांसोबत गप्पांसाठी वेळ द्या.

  • पुस्तक वाचनासाठी वेळ काढा.

  • खूप तीव्र लक्षणं असतील तर मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्या.

मोबाईल काळाची गरज असली तरी स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फोनचा अतिवापर टाळायला हवा....

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT