Yogurt Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Yogurt Side Effects : तुम्हाला सुद्धा दही खूप आवडते ? जाणून घ्या दह्याच्या अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम

Yogurt Benefits : दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन6 आणि प्रोटीन यांसारखे पोषक तत्व उपलब्ध असतात.

कोमल दामुद्रे

Yogurt Side Effects : अनेक भारतीय पदार्थांमध्ये दह्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. दही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते आणि दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन6 आणि प्रोटीन यांसारखे पोषक तत्व उपलब्ध असतात.

दह्याचे सेवन आरोग्यसोबत त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर असते. या सगळ्या फायद्यांशिवाय दही खाण्याचे नुकसान देखील असते. आज आम्ही तुम्हाला दररोज दही खाल्ल्याने कोणत्या प्रकारचे साईड इफेक्ट होतात याबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला दररोज दह्याचे सेवन का करु नये.

A. दररोज दही खाण्याचे नुकसान :

असे म्हटले जाते की तुमची पचनसंस्था व्यवस्थित काम करत नसेल तर तुम्ही दह्याचे सेवन करणे टाळले पाहिजे. पचनसंस्था व्यवस्थित नसल्याने दही खाल्ल्यास कफ सारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. या आजाराचा (Disease) सामना तेव्हा करावा लागतो जेव्हा तुम्ही दररोज एक कपापेक्षा जास्त दही खाता. जर तुम्ही एक कप दही खात असाल तर त्याचे नुकसान तुमच्या शरीरावर होणार नाही.

B. जास्त प्रमाणात दही खाण्याचे नुकसान :

1. पोट फुलणे :

दह्यामध्ये लॅक्टोज उपलब्ध असते. ज्या लोकांना लॅक्टोजची समस्या असेल त्यांनी दह्याचे सेवन केले नाही पाहिजे. लॅक्टोज हे एक प्रकारचे मिल्क शुगर (Sugar) असते. ज्याला शरीरामध्ये उपलब्ध असलेल्या लैक्टस इंजाइमच्या मदतीने पचवले जाऊ शकते. जेव्हा शरीरामध्ये लैक्टस इंजाइम कमी प्रमाणात असते. तेव्हा लॅक्टोज सहजरीत्या पचत नाही त्यामुळे शरीरामध्ये सूज आणि गॅसच्या समस्या वाढु लागतात.

2. वजन वाढू शकते :

त्यामध्ये फॅटची मात्रा भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे दही जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचे वजन देखील वाढू शकते. जेव्हा तुम्ही बाहेरून दही विकत घेता तेव्हा डिटेल्स वाचून फॅट आणि कॅलरीवाले दही खरेदी करण्यापेक्षा, प्रोटीनयुक्त दही खरेदी करा.

3. गुडघ्यांमध्ये दुखू शकते :

डेअरी प्रोडक्ट्समध्ये जास्त प्रमाणात सेक्युरेटेड फॅट आणि ऍडव्हान्स ग्लिकेशनची मात्रा जास्त असते. त्यामुळे गुडघेदुखी ही समस्या वाढू शकते. अशातच अर्थराइटिसच्या रोग्यांनी दहीचे सेवन कमीत कमी प्रमाणात केले पाहिजे. नाहीतर त्यांचे दुखणे जास्त प्रमाणात वाढू शकते.

C. काय म्हणते आयुर्वेद ?

आयुर्वेदमध्ये सांगितले आहे की थंडीच्या दिवसांमध्ये दह्याचे सेवन केले नाही पाहिजे. दही हे थंड असते त्यामुळे दह्याचे सेवन केल्याने तुम्हाला सर्दी (Cold), खोकला, घसा दुखणे यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार दह्याच्या सेवनाने कफ वाढू शकतो. त्यामुळे अस्थमा, सायनस इन्फेक्शन, सर्दी आणि खोकला यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : - लक्ष्मी नारायण चौकात हिंदू समाजातील कार्यकर्ते एकत्र

Shivling: शिवलिंगावर पाणी अर्पण का करतात? जाणून घ्या, त्यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण

SCROLL FOR NEXT