Shivling: शिवलिंगावर पाणी अर्पण का करतात? जाणून घ्या, त्यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण

Scientific Reasons Behind Offering water On Shivling: हिंदू शिवलिंगावर पाणी का चढवलं जातं? या पवित्र विधीमागील धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक तर्क काय आहे. महादेवाला जल अर्पण केल्याने आत्मशांती कसे होते ते जाणून घ्या.
Shivling
Scientific Reasons Behind Offering water On Shivlingsaam tv
Published On
Summary
  • शिवलिंगावर पाणी अर्पण करणे धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.

  • धार्मिक दृष्टिकोनातून हे भगवान शिवाला प्रसन्न करण्याचे पवित्र साधन आहे.

  • वैज्ञानिक कारणांनुसार, जल अर्पणामुळे ऊर्जेचा समतोल साधला जातो आणि मानसिक शांती लाभते.

  • या विधीद्वारे भक्तांना पापमुक्ती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

शिवलिंगावर अर्पण करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. धार्मिक मान्यतेनुसार, हे भगवान महादेवाला प्रसन्न करण्याचा मार्ग आहे. शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानं पापातून मुक्ती मिळते, शिवाय मानसीक शांत मिळते. पण यामागे वैज्ञानिक कारण काय आहे याचं कारण जाणून घेऊ.

हिंदू धर्मात, भगवान शिव यांना विश्वाचा संरक्षण म्हणून ओळखले जाते. त्यांना 'जल तत्वाशी' विशेष आसक्ती असल्याचे मानले जाते. शिवलिंगावर पाणी अर्पण करणे हा भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा एक पवित्र मार्ग आहे. पाणी अर्पण केल्याने भगवान शिव भक्तांची पापातून मुक्तता करतात.

पाणी अर्पण केल्याने भगवान महादेवाचा क्रोध शांत होत असतो, असं शिवपुराण आणि स्कंदपुराण सारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये म्हटलंय. त्रेता युगापासून कलियुगापर्यंत, जलाभिषेक हा पूजेचा एक आवश्यक भाग मानला गेला आहे. त्यात श्रावण महिन्यात शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे महत्त्व आणखी वाढते.

Shivling
Shravan Month: श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये? धार्मिक नव्हे तर 'हे' आहे वैज्ञानिक कारण

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाणी हे शांत आणि थंड करणारे घटक आहे. शिवलिंग हे सहसा दगडापासून बनलेले असते आणि पाणी अर्पण केल्याने ते थंड राहते. यामुळे आजूबाजूचे वातावरण शुद्ध आणि शांत होते, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. शिवलिंगावर पाणी ओतल्याने सकारात्मक ऊर्जा संक्रमित होते. शिवलिंगातून जेव्हा पाणी पृथ्वीवर पडते तेव्हा ते त्याच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट करते.

ते ऊर्जा संतुलनाचे माध्यम देखील मानले जाते. यामुळे घर आणि मन दोन्हीमध्ये शुद्धता आणते. शिवलिंगावर पाणी ओतल्याने अनेक मानसिक आणि शारीरिक आजार बरे होतात. नियमित जलाभिषेक केल्याने ताण, चिंता आणि राग यासारख्या समस्या दूर होतात. यामुळे व्यक्तीचे मन एकाग्र आणि शांत राहते.

Q

शिवलिंगावर पाणी अर्पण का केले जाते?

A

भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी व पापमुक्तीसाठी पाणी अर्पण केले जाते.

Q

यामागे कोणती धार्मिक भावना आहे?

A

शिव जलतत्त्वाशी निगडित असल्याने, जल अर्पणाने त्यांची कृपा मिळते अशी श्रद्धा आहे.

Q

यामागे वैज्ञानिक कारण काय आहे?

A

जल अर्पणामुळे परिसरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते व मानसिक शांतता मिळते.

Q

शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याचे फायदे कोणते?

A

मनःशांती, पापमुक्ती, आणि ऊर्जा संतुलन साधले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com