Cold Drink Side Effects : उन्हाळ्यात सतत कोल्ड ड्रिंकचे सेवन करताय ? जडू शकतो गंभीर आजार !

Summer Care Tips : या दिवसात उन्हापासून आराम मिळवण्यासाठी कोल्ड ड्रिंक्सची मागणी अधिक प्रमाणात वाढते.
Cold Drink Side Effects
Cold Drink Side EffectsSaam Tv

Cold Drink Side Effects : काही दिवसातच उन्हाळा सुरू होणार आहे त्यामुळे उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा त्रास कमी करण्यासाठी लोक प्रयत्न करत असतात.त्यात खाण्यापिण्यापासून ते राहणीमानापर्यंत सर्व काही बदलते.

या दिवसात उन्हापासून आराम मिळवण्यासाठी कोल्ड ड्रिंक्सची मागणी अधिक प्रमाणात वाढते.पण तुम्हाला माहित आहे का उन्हापासून आराम देणारे कोल्ड ड्रिंक्स तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. चला तर मग जाणून घेऊया कोल्ड ड्रिंक्समुळे आरोग्याला (Health) होणारे तोटे

Cold Drink Side Effects
Cold Milk Benefits : थंड दूध पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे, जाणून घ्या

1. ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते

कोल्ड ड्रिंक्समध्ये साखर खूप जास्त प्रमाणात वापरतात.अशा वेळेस जर तुम्ही जास्त कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने तुमच्या शरीरातील ब्लड शुगर (Sugar) लेव्हल वाढण्याची शक्यता असते.साखरेचे प्रमाण शरीरात भरपूर वाढल्याने आरोग्याचे नुकसान होऊन अनेक गंभीर आजारांचे कारण ठरू शकते तसेच टाईप 2 मधुमेहाचा (Diabetes) धोखा देखील वाढतो.

2. पोटासाठी वाईट

कार्बन डायऑक्साईड बऱ्याच कोल्ड ड्रिंक्स मध्ये असते.त्याचे उन्हाळामुळे पोटात गेलेकीच गॅस मध्ये रुपांतर होते.त्यामुळे भरपुरे लोकांना कोल्ड ड्रिंक्स पील्या नंतर लगेच ढेकर येतात. जे कार्बन डायऑक्साइड कोल्ड ड्रिंक्स मध्ये आढळतात ते पोटासाठी ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते परिणामी पोटात निर्माण होणारे एंझाइम प्रभावित होतात.म्हणून बऱ्याचदा कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यावर छातीत जळजळ होते.

Cold Drink Side Effects
Drinking Water Before Brushing In The Morning : सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे, फक्त ही चूक करू नका!

3. किडनीवर होतो परिणाम

साखरेचे प्रमाण कोल्ड्रिंक्समध्ये असल्याने मधुमेहाचा धोका वाढतो तसेच आपल्या किडनीवरही वाईट परिणाम होऊन किडनीचे नुकसान होण्याची शक्यता असते.ब्लड शुगर लेव्हल शरीरात वाढल्याने स्नायूंना या साखरेचा वापर करताना अडथळा येतो त्यामुळे स्नायूंना साखरेचा पुरेपूर वापर करता येत नाही. म्हणून किडनी ही साखर लघवीद्वारे शरीरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, मूत्रपिंडांना सामान्यपेक्षा कितीतरी पटीने जास्त काम करावे लागल्याने किडणीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

4. दातांसाठी वाईट

फॉस्फोरिक आणि कार्बोनिक ऍसिड कोल्ड ड्रिंक्स किंवा सोडा ड्रिंक्समध्ये असतात जे आपल्या दातांसाठी खूप हानिकारक असते. त्यामुळे कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने दातांचा संरक्षणात्मक थर म्हणजेच इनॅमल खराब होतो. त्यामुळे अनेक वेळा संवेदनशीलता आणि पोकळीच्या समस्या दातांसाठी निर्माण होऊ शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com