Dangers of eating quickly saam tv
लाईफस्टाईल

Dangers of eating quickly: घाईघाईत जेवणाची सवय तुम्हालाही आहे का? शरीरात सुरू होतो ‘हे’ धोकादायक बदल

How fast eating affects the body: तुम्हाला माहिती आहे का, घाईघाईत जेवण करण्याचे दुष्परिणाम केवळ पोटावरच होत नाहीत, तर ते तुमच्या संपूर्ण शरीरात गंभीर आणि धोकादायक बदल घडवून आणू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

ऑफिसला जायचंय किंवा लंच ब्रेक संपाणार आहे, अशावेळी आपण पटापट जेवतो. कदाचित तु्म्हालाही ही सवय असेल. मात्र ही सवय तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण त्यामुळे पोट फुगणं, गॅस होणं आणि अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात. याच गोष्टीचं उदाहरण एका इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्या व्हिडिओमध्ये ब्लॉग करणाऱ्या व्यक्तीने दोन झिप-लॉक पिशव्यांमध्ये पाणी घेतलं आणि त्यात बेकिंग सोडा टाकला.

ज्यावेळी बेकिंग सोडा हळूहळू टाकला, तेव्हा काही घडलं नाही. पण तोच सोडा पटकन आणि जास्त प्रमाणात टाकल्यावर पाणी उफाळून बाहेर आलं. हे आपल्या पोटातही तसंच घडू शकतं. ज्यावेळी आपण अन्न पटकन आणि न चावता खातो, तेव्हा पोटावर ताण येतो आणि त्याला ते अन्न पचवणं कठीण जातं. त्यामुळे निष्कर्ष असा की, जेवताना हळूहळू, शांतपणे आणि व्यवस्थित चावून खायला हवं, म्हणजे पोटाला अन्न नीट पचवता येतं आणि त्रास होत नाही.

असं का होतं?

परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल सांगतात की, ज्यावेळी आपण खूप पटकन खातो तेव्हा अन्नाबरोबर जास्त प्रमाणात हवा गिळली जाते. त्यामुळे पोट फुगते, ढेकर येतात आणि अस्वस्थता जाणवते.

त्याशिवाय, न चावता अन्न गिळल्यामुळे पोटाला ते अन्न तुकडे करून पचवायला अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे अपचन, आम्लपित्त आणि छातीत जळजळ होऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण खूप वेगात खातो, तेव्हा मेंदूला तृप्तीची जाणीव होण्याआधीच आपण अधिक अन्न खाऊन टाकतो. त्यामुळे जास्त खाण्याची आणि वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते.

तज्ञांच्या मते, अशा प्रकारे जलद जेवण केल्याने पचनक्रियेवर अतिरिक्त ताण येतो. ज्यामुळे आम्लपित्त, अॅसिड रिफ्लक्स आणि पोटदुखीसारख्या समस्या होऊ शकतात. यामुळे मेटाबॉलिझमही मंदावतो. म्हणूनच आरोग्य जपायचं असेल तर हळूहळू आणि शांतपणे जेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

काय करावं?

  • जेवताना अन्नाचे छोटे घास घ्या आणि ते व्यवस्थित चावून खा.

  • मोठे घास घेणं टाळा.

  • शक्यतो शांत वातावरणात, कोणत्याही व्यत्ययांशिवाय जेवण करा.

  • जेवताना पाणी पिऊ नका, कारण त्यामुळे पोट पटकन भरल्यासारखं वाटतं आणि अन्न नीट पचत नाही.

  • 20-30 मिनिटे आधी पाणी प्या. हे पचनक्रियेला मदत करतं.

जेवण करण्याच्या सवयींमध्ये केलेल्या अशा साध्या बदलांमुळे पचनसंस्था चांगली राहते आणि दीर्घकाळ आरोग्यही टिकून राहतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT