Plastic Water Bottle Side Effects
Plastic Water Bottle Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Plastic Water Bottle Side Effects : तुम्हाला सुद्धा प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिण्याची सवय आहे ? जडू शकतो गंभीर आजार

कोमल दामुद्रे

Diabetes Health Issue : मधुमेहाचा आजार सध्या झपाट्याने वाढत आहे. सध्या, भरतात सुमारे 80 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. तर 2045 पर्यंत ही संख्या 138 दशलक्ष होण्याची शक्यता आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याची चुकीची पद्धत यामुळे टाईप 2 मधुमेह होतो.

मात्र एका नवीन संशोधनात असे आढळून आले की, प्लास्टिकमधील हलनिकारक रसायनांमुळे महिलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढतो. प्लास्टिकचा वापर आपल्या जीवनात रुजला आहे. प्रत्येकजण प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पितात.

पण संशोधनात ठामपणे असे सांगण्यात आले की, जर महिलांनी प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्यास त्यांना मधुमेह (Diabetes) टाइप 2 मधुमेहचा धोका वाढतो. संशोधनानुसार, प्लास्टिकमध्ये असलेल्या phthalates केमिकलच्या संपर्कात जेव्हा महिला येतात तेव्हा त्यांना

टाइप 2 मधुमेहाचा धोका अधिक जास्त वाढतो. Phthalates प्लास्टिकमध्ये आढळणाऱ्या केमीकलचा समूह आहे. हे अतिशय घातक केमिकल महिलांसाठी (Women) हानिकारक आहे.

Phthalates केमिकल काय आहे?

Phthalates महिलांवर खूप नकारात्मक परिणाम करतात. असे ग्लोबल डायबेटिक कम्युनिटीच्या वेबसाइटनुसार, संशोधकांच्या टीमने म्हटले आहे. Phthalates केमिकलचा समूह प्लास्टिकमध्ये असतो. अभ्यासानुसार, phthalates हे अंतःस्रावी विघटन करणारे केमिकल आहे. म्हणजेच हे अंतःस्रावी ग्रंथीतून बाहेर पडणाऱ्या संप्रेरकांमध्ये अडथळा निर्माण करणारे केमिकल आहे.

रिसर्चनुसार विविध देशांतील 1300 महिलांवर प्रयोग करण्यात आला आणि सहा वर्षे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले. तर संशोधकांना असे आढळले की phthalates केमिकलच्या संपर्कात आल्याने 30 ते 63 टक्के महिलांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. मात्र, आश्चर्यकाराक बाब म्हणजे phthalates च्या संपर्कात आल्यामुळे आशियाई महिलांवर त्याचा परिणाम दिसून आला नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

kalyan Crime News : लग्नाला दिलेला नकार पोराला पचला नाही, रागाच्या भरात नको ते करून बसला!

Madhurani Gokhale : ‘आई कुठे काय करते’तल्या ‘अरुंधती’चं निस्सिम सौंदर्य

PM Modi Property: पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या संपत्तीत किती झाली वाढ? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT