Drying clothes at night saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: तुम्हीही धुतलेले कपडे रात्रीच्या वेळी खिडकीबाहेर वाळत घालता? वास्तूशास्त्रानुसार ही चूक पडू शकते महागात

Drying clothes at night: वास्तुशास्त्रानुसार रात्री घराबाहेर किंवा बाल्कनीत कपडे वाळत घालणे योग्य मानले जात नाही. यामागील पारंपरिक समजुती, रात्री कपडे वाळत घालताना घ्यायची काळजी आणि घरात कपडे वाळवण्याचे सोपे उपाय जाणून घ्या. कपडे पूर्ण कोरडे ठेवण्याचे महत्त्वही समजून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहावी यासाठी अनेक जण वास्तुशास्त्रातील नियम पाळतात. घरातील वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आलेत. अगदी कपडे वाळत घालण्याबाबतही काही समजुती आहेत.

तुम्हीही वेळेअभावी रात्री कपडे धुऊन घराबाहेर किंवा बाल्कनीत वाळत घालत असाल तर ही माहिती नक्की वाचा. वास्तुशास्त्रानुसार, रात्री बाहेर कपडे वाळत घालणं योग्य मानलं जात नाही. यामागे काय कारणं सांगितली जातात आणि रात्री कपडे वाळत घालावे लागल्यास काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊया.

रात्री कपडे वाळत घातल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते?

वास्तुशास्त्रानुसार, रात्रीचा वेळ नकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. सूर्यास्तानंतर वातावरणात नकारात्मकता वाढते अशी समजूत आहे. त्यामुळे रात्री कपडे धुऊन ते मोकळ्या जागेत किंवा बाल्कनीत वाळत घालू नयेत असं वास्तुशास्त्रात सांगितलंय.

असं मानलं जातं की, रात्री बाहेर ठेवलेले कपडे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. दुसऱ्या दिवशी हे कपडे घातल्यावर त्याचा परिणाम व्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे व्यक्तीला चिडचिड होणं किंवा स्वभावात बदल जाणवणं अशा गोष्टी घडू शकतात.

सुख-समृद्धी आणि आरोग्यावर परिणाम?

वास्तुशास्त्रानुसार, दिवसा सूर्यप्रकाश मिळतो मात्र रात्री सूर्याची किरणं नसतात. या वेळी चंद्रप्रकाश आणि दव पडतं. रात्रीच्या दवामुळे कपडे ओले राहिल्यास ते घालणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं नाही. ओलसर कपड्यांमुळे त्वचेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असू शकते.

याशिवाय रात्री कपडे बाहेर वाळत ठेवल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी वास्तुशास्त्रातील समजूत आहे. घरातील लोक वारंवार आजारी पडल्यास औषधोपचारांवर खर्च वाढू शकतो. त्यामुळे पैशांची चणचण निर्माण होऊन कुटुंबात तणावाचं वातावरण तयार होऊ शकतं, असंही सांगितलं जातंय.

घरात सुख-शांती टिकवण्यासाठी काय करावं?

वास्तुशास्त्रानुसार, घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक वातावरण टिकवण्यासाठी कपडे शक्यतो दिवसा सूर्यप्रकाशात वाळत घालावेत. सूर्यप्रकाशामुळे कपडे लवकर सुकण्यास मदत होते. योग्य सूर्यप्रकाशामुळे काही प्रकारचे जंतू कमी होण्यासही मदत होऊ शकते.

दिवसा कपडे वाळत घालणं शक्य असल्यास त्याला प्राधान्य द्यावं. यामुळे कपडे व्यवस्थित सुकतात आणि त्यांना ओलसरपणाचा वास येण्याची शक्यताही कमी होते. कपडे पूर्णपणे सुकल्यानंतरच ते वापरणे चांगले.

रात्री कपडे धुणे गरजेचं असेल तर काय कराल?

काही वेळा कामाच्या व्यापामुळे दिवसा कपडे धुण्यास वेळ मिळत नाही. अशा वेळी रात्री कपडे धुवावे लागतात. मात्र, वास्तुशास्त्रातील समजुतीनुसार रात्री कपडे घराबाहेर किंवा मोकळ्या बाल्कनीत वाळत घालणं टाळावं.

त्याऐवजी घरातील मोकळ्या खोलीत कपडे वाळत घालू शकता. पंख्याची हवा मिळेल अशा ठिकाणी कपडे ठेवल्यास ते सुकण्यास मदत होईल. खोलीत हवा खेळती राहील, याचीही काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे झोपण्यापूर्वी घराबाहेर वाळत घातलेले कपडे काढून आत ठेवावेत, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. हे छोटे बदल केल्याने वास्तुशास्त्रातील नियम पाळण्यास मदत होऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Lip Care: ओठ कोरडे आणि काळे पडलेत? मग घरी तयार करुन लावा 'हा' लिप बम, ओठ राहतील मऊ आणि मुलायम

Maharashtra News Live Update: शरद पवार उद्यापासून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधणार

मावळमध्ये डंपरच्या धडकेने ग्रामस्थाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचे 'चक्का जाम' आंदोलन

Tissue Silk Saree Designs: सणासुदीला आणि लग्नात उठून दिसायचंय? पाहा टिश्यू सिल्क साडीचे ७ खास डिझाइन्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी होणार? फिटमेंट फॅक्टर ४ ची चर्चा, पगार किती वाढणार?

SCROLL FOR NEXT