Winter Fashion Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Fashion Tips : हिवाळ्यात असा करा स्टायलिश लूक, थंडीपासून होईल बचाव

उन्हाळा-पावसाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात आजारांची मोठ्या प्रमाणात लागण होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Winter Fashion Tips : उन्हाळा-पावसाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात आजारांची मोठ्या प्रमाणात लागण होते. म्हणून आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला आपल्याला आवर्जून दिला जातो. थंडीपासून बचाव करण्यासाठी कपाटातलं स्वेटर, मफलर, कानटोपी, हुडी असं एक-एक करून बरंच काही बाहेर येऊ लागतं. कारण रोज तेच-तेच स्वेटर कसं वापरणार? म्हणजे सवाल फॅशन स्टेटसचा सुद्धा असतो ना.

बहुतांश जणांना हिवाळ्यात आरोग्यासोबत फॅशनची देखील तितकीच काळजी असते. हिवाळा सुरु झाला की थंडीमुळे आपले कपडे वापरण्याच्या पद्धतीत फरक पडतो. थंडीपासून वाचायचे म्हणून हिवाळ्यामध्ये आपल्या स्टाईलश कॉम्प्रमाईझ करायचे.त्यामुळे या हिवाळ्यात तुम्हाला बेस्ट फॅशनिस्टा व्हायचं असेल वाचा या शानदार टिप्स.

Woolen Hat

लोकरी टोपी -

हिवाळ्यात लोकरी टोपी खूप स्टायलिश दिसतात.बाहेर कोठे जाताना सहज घालता येते.लोकरी टोपी मध्ये वेगवेगळया कलरचे तसेच अनेक आकरचे टोप्या सहज मिळतात.सर्दी टाळण्यासाठी तुम्ही टोपीच्या आकाराची लोकरीची टोपी घालून बाहेर जाऊ शकता.या प्रकारची टोपी जॅकेट सोबत खूप छान लूक देते, मुली ओव्हर कोट सोबत लोकराची टोपी घालू शकतात.

Skull Cap

स्कल कॅप -

जर तुमचे केस लांब आणि तुम्हाला केस मोकळे सोडायचे आहेत तर स्कल कॅप हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. तसेच ही कॅप तुम्ही कुर्ती सोबत परिधान केल्यास खूप सुंदर लूक येतो,ही कॅप मुलायम कापडापासून तयार केलेली असते. त्याचप्रकारे टी-शर्ट वर स्कल कॅप अतिशय कूल दिसते.

French Cap

फ्रेंच कॅप -

हिवाळ्यात लोकरी टोपी मध्ये स्टायलिश दिसण्यासाठी फ्रेंच कॅप हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे.मुली फ्रेंच कॅप शॉर्ट ड्रेस,लेझर चे जॅकेट, पँट यावर परिधान करू शकतात.या कॅप मुळे केस खराब होते नाहीत.

Cosat Cap

कोसॅट कॅप -

मुलं आणि मुली दोघे कोसॅट कॅप परिधान करून स्टायलिश लूक करू शकतात. ही कॅप अतिशय मऊ आणि आरामदायक वाटते.या कॅप तुम्हाला मार्केट सहज मिळतात त्यात अनेक कलरस,प्रिंट्स मिळतील. वेस्टर्न कपड्यांवर कोसॅट कॅप स्टायलिश दिसते.

Bucket Cap

बकेट हॅट -

हिवाळ्यात ट्रीपला जायचे प्लॅन बनत असतातच. तुम्ही ट्रीपला जाताना बकेट हॅटचा वापर करू शकता ही हॅट खूप खोल आणि आरामदायक आहे. ही हॅट तुम्हाला कूल लूक देते.जीन्स आणि स्वेटरसह ते परिधान केल्यास खुप छान दिसते येतो तसेच त्यातून हवा अजिबात जात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT