रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करा 'ही' सोपी योगासने saam tv
लाईफस्टाईल

रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करा 'ही' सोपी योगासने

रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज १५ मिनिटे योगसने केल्यास याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काही लोकांना खूप राग (Anger) येतो. मात्र हे आजूबाजूच्या लोकांसाठी तसेच त्यांच्यासाठी देखील हानिकारक असू शकते. जास्त रागामुळे मानसिक त्रासदेखील (Mental Stress) उद्भवू शकतो. परंतु जर तुम्ही दररोज १५ मिनिटे योगसने (Yogasane) केल्यास तुमचे मन पूर्णपणे शांत होईल आणि तुम्ही रागावणे थांबवाल. तसेच आपल्यासाठी काय योग्य आणि काय चुकीचे आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. (Do this simple yoga to control your anger)

- राग येण्याची सवय दूर करण्यासाठी

दररोजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण, प्रवास, धकाधकीचे आयुष्य यांमुळे आपली खुप चिडचिड होत असते. अनेकदा ही चिडचिडेपणा रागात रुपांतरित होतो. छोट्या छोट्या गोष्टींचाही राग येऊ लागतो. आपल्या अशा रागीट स्वभावामुळे अनेकदा आपलीच जवळची माणसे दुखावली जातात. मात्र या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज १५ मिनिटे योगसने केल्यास तुम्ही तुमच्या रागावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकाल.

अनुलोम-विलोम प्राणायाम

अनुलोम-विलोम प्राणायाम हे मन आणि शरीर शांत करण्याचा एक चांगला मार्ग आहे. हे करण्यासाठी, जमिनीवर ताठ बसा. आता एक हात गुडघावर ठेवा आणि डाव्या हाताच्या बोटाने डाव्या बाजूची नसिका (नाकपुडी) बंद करा आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, आणि पुन्हा डाव्या बाजूने श्वास सोडा. आता उजव्या बाजूची नाकपुडी बंद करुन डाव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि पुन्हा उजव्या बाजूने श्वास सोडा.

अनुलोम -विलोम

गणेश मुद्रा

गणेश मुद्रा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि मनाला शांत करण्यास मदत करते. गणेश मुद्रा करण्यासाठी जमिनीवर ताठ बसा आणि आपले खांदे सैल ठेवा. यानंतर, आपल्या डाव्या तळहाताला हृदयासमोर आणा. तळहात शरीराच्या बाहेरील बाजूस ठेवा. आता उजव्या तळहाताला उचलून डाव्या तळहाताजवळ आणा आणि तळवे शरीरावर ठेवा. आता दोन्ही हातांच्या बोटांना एकमेकांना अडकवा आणि या स्थितीत हळूहळू श्वास घ्या आणि सोडा.

ganesh mudra

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT