लाईफस्टाईल

Sawan Budhwar Upay : श्रावणातील बुधवारी करा 'हे' सोपे उपाय; गणपती बाप्पा सोबत शंकराचाही मिळेळ आशीर्वाद

Shravan Wednesday remedy: श्रावण महिन्यात सोमवार भगवान शंकराला समर्पित असतो, त्याचप्रमाणे बुधवार हा गणपती बाप्पा आणि बुध ग्रहाला समर्पित असतो. भगवान शिवशंकरांच्या पुत्राचे म्हणजे गणपती बाप्पाचे बुधवारी विशेष पूजन केल्याने ते प्रसन्न होतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित असून, यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे.

  • बुधवारचा दिवस गणपती बाप्पासाठी समर्पित आहे आणि श्रावणातील बुधवार विशेष फळदायी मानला जातो.

  • शिवलिंगावर 108 मूग अर्पण करून आरोग्य आणि आर्थिक सुधारणा मिळते.

श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जातो. असं मानलं जातं की हा संपूर्ण महिना भगवान शिवाला अर्पण केलेला असतो. या काळात भक्तगण नियमितरित्या शिवपूजन, व्रत आणि उपासना करतात. याच महिन्यात येणारा प्रत्येक दिवस देखील अत्यंत महत्वाचा मानला जातो. आठवड्याच्या प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवतेची विशेष पूजा केली जाते. तर बुधवारचा दिवस गणपती बाप्पासाठी समर्पित असतो.

श्रावणात जर एखादा बुधवार आला तर त्या दिवशी काही खास उपाय केल्यास भगवान शंकरासोबतच गणपती बाप्पाचीही कृपा प्राप्त होऊ शकते. या उपायांमुळे केवळ भक्ती लाभत नाही, तर जीवनातील आर्थिक अडचणीही हळूहळू दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया आपण बुधवारच्या दिवशी कोणते उपाय करू शकतो.

आर्थिक उन्नतीसाठी उपाय

जर तुम्ही आरोग्याच्या समस्या किंवा पैशाच्या अडचणींना सामोरे जात असाल तर श्रावणातील बुधवारच्या दिवशी एक साधा पण प्रभावी उपाय करून पाहा. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. नंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन १०८ मूग शिवलिंगावर अर्पण करा. अर्पण करताना 'ॐ नमः शिवाय' हा जप १०८ वेळा करा. हा उपाय शिवपुराणात सांगितलाय. यामुळे शरीरातील आजार दूर होतात आणि आर्थिक स्थितीतही सुधारणा होते.

जीवनात प्रगतीसाठी उपाय

श्रावणातील बुधवारच्या दिवशी फक्त गणपतीची पूजा करून थांबू नका. त्या दिवशी एखाद्या गरजूला सव्वा किलो मूग डाळ दान करा. हे अतिशय शुभ मानलं जातं. असं केल्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि यशाचे नवीन मार्ग उघडतात. याच दिवशी २५० ग्रॅम मूग डाळ वाहत्या पाण्यात विसर्जित करणं देखील लाभदायक ठरतं.

घरात सुख शांतीसाठी उपाय

बुधवारच्या दिवशी गाईला अन्न खाऊ घालणं हे खूप पुण्यदायी मानण्यात येतं. त्यामुळे त्या दिवशी गाईला पालक खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. जर पालक शक्य नसेल, तर हिरवा चारा देखील चालतो. हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचप्रमाणे घरामध्ये सुखशांती नांदण्यास मदत होते.

बुद्धी आणि एकाग्रतेसाठी उपाय

बुधवारी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर गणपतीची विधिवत पूजा करा आणि त्यांना फुलं अर्पण करा. या उपायाने केवळ देवांची कृपा मिळत नाही, तर मन स्थिर होते, एकाग्रता वाढते.

धनदोष दूर करण्यासाठी उपाय

जर घरात कायम आर्थिक अडचणी येत असतील तर बुधवारच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला हिरव्या वस्त्रांचं दान करा. हे दान फारच शुभ मानले जाते. हा उपाय केल्यास धनाच्या अडचणी दूर होतात आणि आर्थिक स्थितीतही लक्षणीय सुधारणा होते.

श्रावण महिना कोणाला समर्पित आहे?

श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे.

श्रावणातील बुधवारच्या दिवशी कोणाची पूजा करावी?

भगवान शिव आणि गणपती बाप्पाची पूजा करावी.

शिवलिंगावर किती मूग अर्पण करावे?

108 मूग अर्पण करावे.

घरात सुखशांतीसाठी काय उपाय करावा?

बुधवारी गाईला पालक किंवा हिरवा चारा खाऊ घालावा.

धनदोष दूर करण्यासाठी काय दान करावे?

हिरव्या वस्त्रांचे दान करावे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT