eye makeup tips, eyeliner tips in Marathi, beauty tips in Marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी असा करा डोळ्यांचा मेकअप !

डोळ्यांची सुंदरता वाढवण्यासाठी मेकअप टिप्स

कोमल दामुद्रे

मुंबई : त्वचेच्या सुंदरतेसाठी आपण त्याच्यावर रोज नवनवीन महागडे उत्पादनांचा वापर करत असतो. परंतु, त्याचे सौंदर्य जपणे अधिक कठीण काम असते.

हे देखील पहा -

डोळे हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याची सुंदरता जपण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. पार्टी (Party), लग्न कार्य किंवा इतर कोणत्याही क्षणी आपण आपल्या डोळ्यांना सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच त्याची सुंदरता वाढवण्यासाठी आपण त्याच्यावर अनेक प्रकारचा मेकअप करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, डोळ्यांना मेकअप करणे कठीण काम असते. आपण तो करण्यासाठी आपण खूप घाबरत असतो. डोळ्यांना सुंदर बनवण्याचे काम आयलाइनर करत असते. पण ते योग्यरित्या लावायचे कसे हे आपल्या माहित नसते. अशावेळी डोळ्यांची सुंदरता वाढूवन मेकअप कसा करु शकतो हे जाणून घेऊया.

१. डोळ्यांना (Eye) मेकअप करण्यापूर्वी आपल्या पापण्या स्वच्छ आहे की, नाही याची खात्री करा नंतर त्यांना प्राइमर लावा ज्यामुळे आपला मेकअप खराब होणार नाही व तो अधिक काळ टिकेल.

२. आपल्या डोळ्यांच्या पापण्या अधिक दाट दिसण्यासाठी आयलायनरवर लॅशेस घट्ट लावा ज्यामुळे पापण्या सुंदर दिसतील. लिक्विड लाइनयर लावल्या जमत नसल्यास आपण पेन्सिलच्या लाइनरचा वापर करु शकतो.

३. आयशॅडो दिवसभर टिकून राहाण्यासाठी आपण चांगल्या प्रकारचा प्राइमर वापरायला हवा. तसेच आपल्या भुवयांना व्यवस्थित करण्यासाठी आपण त्यांसाठी जेलचा वापर करु शकतो.

४. पापण्यावर मस्कारा लावताना तो हळूहळू लावावा व त्यानंतर त्याचा दुसरा थर लावण्यापूर्वी १० सेकंद थांबून पुन्हा लावण्याचा प्रयत्न करा.

५. मस्करा लावण्यापूर्वी टिश्यूचा वापर करुन डोळ्यांवर जास्तीचा मस्करा, लाइनर किंवा जेल पसरले असेल तर पुसून टाका. अशाप्रकारे आपण डोळ्यांचा मेकअप करु शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या ब्युटीशियनशी संपर्क साधावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT