सूट मिळणाऱ्या ग्रोसरी स्टोरमधून हे पदार्थ कधीच खरेदी करु नका

ग्रोसरी स्टोरमधून खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या.
grocery store, Never buy these things from grocery store
grocery store, Never buy these things from grocery storeब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आपण सामान खरेदी करण्यासाठी डी-मार्ट किंवा ग्रोसरी स्टोरला जातो. सणांच्या दिवशी किंवा इतर वेळी काही प्रमाणात आपल्याला सूट मिळते. त्यामुळे आपण अशावेळी जास्तीचा सामान भरतो.

हे देखील पहा -

ग्रोसरी स्टोरला गेल्यानंतर अधिकतर मुले व महिला खाण्यापिण्याच्या वस्तू सूट असल्यावर जास्त प्रमाणात घेतात. कमी पैशांच्या किमतीमुळे आपण एकाच महिन्यात दोन महिन्याचा सामान भरतो. मुलांना अधिकतर चॉकलेट, केक व फास्ट फूड घेण्याची सवय असते. सूट मिळत असल्यामुळे मुले अधिकतर याची खरेदी करतात. पण अशावेळी कोणत्या वस्तूंची जास्त खरेदी करु नये हे जाणून घेऊया.

१. ग्रोसरी स्टोरला गेल्यानंतर आपण ग्रॅन्युला बारवर सूट बघून ते अधिक प्रमाणात खरेदी करतो. हे बार टिकवण्यासाठी यात प्रिझर्वेटिव्ह पदार्थ अधिक प्रमाणात असतात त्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.

२. बाटलीबंद सॉसमध्ये देखील भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह घटक असतात. ज्यामुळे ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकते. काहीवेळा काही स्टोर हे जुने व विकले न जाणाऱ्या बाटलीबंद सॉसवर सूट ठेवतात ज्याचा विकत घेण्याचा काही उपयोग नाही.

grocery store, Never buy these things from grocery store
हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरेल मशरुम !

३. ग्रोसरी स्टोरमधून आपण फळे व भाज्या खरेदी करतो पण, त्याची शेल्फ वाढण्यासाठी त्यातही अनेक घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे फळांमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्सची कमतरता कमी होते व आपल्या आरोग्याला नुकसान होते.

४. आपला वेळ वाचवण्यासाठी आपण किसलेल्या चीजचा वापर करतो. स्वस्त मिळत असणाऱ्या चीजचा विकत घेतल्याने ते काही दिवसात खराब होते. अशावेळी आपण चीजचा ब्लॉक घेणे फायदेशीर ठरेल.

५. किराणा दुकानातून खरेदी (Shopping) करताना आपण बहुतेक वेळा घरातील भांडी खरेदी करतो परंतु, काहीवेळा या भांड्यांची गुणवत्ता ही फारशी चांगली नसते त्यासाठी यांची नीट तपासणी करुन घ्या.

६. किराणा दुकानात मसाले (Spices) आणि ताजे किंवा वाळलेल्या औषधी वनस्पती खूप महाग असतात. आपल्याला ताजे मसाले आणि औषधी वनस्पती हव्या असतील तर आपण आपल्या घरी ते किचन गार्डनमध्ये लावू शकतो. तसेच, किराणा दुकानातून खरेदी करण्यापेक्षा बाहेरील दुकानातून खरेदी करणे चांगले असेल.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com