Shravan Somvar SAAM TV
लाईफस्टाईल

Shravan Somvar 2024 : श्रावण सोमवारी राशीनुसार करा 'हे' उपाय; महादेवाची राहील कृपा अन् पैसा चुंबकासारखा तुमच्याकडे आकर्षित होईल

Zodiac Signs : श्रावण सोमवारी भोलेनाथांना प्रसन्न करायचे असल्यास तुमच्या राशीनुसार उपाय करा. तसेच या उपायांमुळे तुमचे आर्थिक संकटही दूर होईल.

Shreya Maskar

श्रावणात सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. सर्वजण भगवान शंकराच्या भक्तीत तल्लीन होतात. श्रावणी सोमवारचे व्रत करून महादेवाला प्रसन्न करतात. श्रावणी सोमवारचे व्रत आणखी फळण्यासाठी तुम्ही राशीनुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी 'हे' उपाय करा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

मेष रास

मेष राशीच्या लोकांनी प्रत्येक श्रावणी सोमवारी पांढरे, शुभ्र वस्त्र परिधान करून शंकराच्या मंदिरात सकाळी जावे आणि शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना पैशाची चणचण भासत असेल तर, श्रावण महिन्याच्या सोमवारी शंकराच्या पिंडीवर गंगाजल अर्पण करावे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि समाधान राहण्यासाठी श्रावणी सोमवारी सकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन शिव तांडव स्तोत्राचं पठण करावं.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी तांदळाचे दाणे शिवलिंगाला अर्पण करावेत. तांदूळ स्वच्छ असतील याची खबरदारी घ्यावी. यामुळे पैशांचे मार्ग खुले होतील.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांनी आपल्या प्रगतीसाठी श्रावणातील कोणत्याही एका सोमवारी घरात शंकराची पूजा ठेवून दुधाचा अभिषेक करावा. तसेच ११ गरिबांना जेवण द्यावे. पूजेदरम्यान महादेवाला चंदन आणि पांढरी फुलं अर्पण करावी.

कन्या रास

कन्या राशीची लोक खूप भावनिक असतात. त्यामुळे आपले दुःख दूर करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी या लोकांनी श्रावण सोमवारी महादेवाला खीर अर्पण करावी. मात्र लक्षात असू द्या खीर स्वतः बनवलेली असावी. बाजारातील किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी बनवलेली नको.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी संध्याकाळी पूजा करताना भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी.

वृश्चिक रास

दर सोमवारी श्रावणात शिव चालीसाचे पठण करावे. यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल आणि खिशात पैसा टिकून राहील.

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी सूर्योदयावेळी उठून ॐ नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

मकर रास

मकर राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी गाईची पूजा करावी. तसेच इतर प्राण्यांना खाऊ घालावे. संध्याकाळी शिवलिंगावर जलाभिषेक करावा. यामुळे घरात शांती लाभले.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी दुपारच्या आत शंकराची पूजा करून १०१ शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे. त्यातील एक बेलपत्र घरातील तिजोरीत ठेवावे. यामुळे तुम्हाला कधीच पैशांची कमतरता भासणार नाही आणि घरात पैसा टिकून राहील.

मीन रास

मीन राशीच्या लोकांनी श्रावणात सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी कच्च्या दुधाचा भोलेनाथाना अभिषेक करावा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT