Sunday remedies for life problems saam tv
लाईफस्टाईल

Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी करा हे 6 सोपे उपाय; आयुष्यातील प्रत्येक अडचणी होतील दूर

Sunday remedies for life problems: सूर्य हा ऊर्जा, आत्मविश्वस, मान-सन्मान, यश आणि पित्याचा कारक मानला जातो. जर तुमच्या कुंडलीत सूर्य ग्रह कमजोर असेल, तर तुम्हाला करिअरमध्ये अडचणी येतात, मान-सन्मान मिळत नाही आणि आरोग्याच्या समस्या जाणवतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो.

  • सूर्योदयापूर्वी उठून पूजा करावी.

  • लाल कपडे आणि तिलक सूर्यदेवाला प्रिय आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार रविवार हा सूर्यदेवांचा दिवस मानला जातो. सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. सूर्यदेव प्रसन्न असतील तर व्यक्तीला उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि मान-सन्मान मिळतो. पण जर सूर्य कुंडलीत अशक्त असेल तर आयुष्यात अडथळे येतात, आरोग्य बिघडतं आणि यश मिळण्यात अडचणी निर्माण होतात. अशावेळी सूर्यदेवाची पूजा आणि काही सोपे उपाय केल्यास या सगळ्या समस्या दूर होऊ शकतात.

सूर्यदेवाच्या विशेष कृपेने ग्रहदोष शांत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे जीवनात सकारात्मक बदल होतात. रविवारच्या दिवशी काही सोपे उपाय नियमित केल्यास आयुष्य सुखी आणि समृद्ध होऊ शकते.

सकाळी लवकर उठून पूजा

रविवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं. स्नानानंतर स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. त्यानंतर सूर्याला जल अर्पण करून "ॐ सूर्याय नमः" किंवा "ॐ आदित्याय नमः" असे मंत्र जपावं. अर्घ्य देताना लाल फुले, चंदन, तांदूळ, अक्षता आणि नारळ अर्पण करावे. पूजा झाल्यावर सूर्य स्तोत्राचे पठण करून दीप लावावा.

सूर्य नमस्काराचे महत्त्व

रविवारी सूर्य नमस्कार करणे अत्यंत फलदायी मानलं जातं. सूर्यदेव आनंदी होतात आणि शरीराला देखील त्याचा खूप फायदा होतो. नियमित सूर्य नमस्कार केल्याने शरीराला ऊर्जा मिळतं, मन शांत राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

दान करण्याचे महत्त्व

रविवारी दान करणं शुभ मानलं जातं. या दिवशी गूळ, तांदूळ, दूध, तांब्याची भांडी किंवा लाल रंगाचे कपडे दान करावेत. असं केल्याने पुण्य लाभतं आणि ग्रहदोष दूर होण्यास मदत होते.

लाल रंगाचे महत्त्व

सूर्यदेवाला लाल रंग आवडतो. त्यामुळे रविवारी पूजा करताना लाल कपडे परिधान करणं विशेष फलदायी मानले जाते.

घरात दिवा लावणं

या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना देशी तुपाचा दिवा लावावा. असं केल्याने सूर्यदेवाबरोबरच लक्ष्मीमातेचीही कृपा मिळते. घरात धन, सौभाग्य आणि सकारात्मकता वाढते.

तिलक लावण्याचा फायदा

घरातून बाहेर पडताना कपाळावर चंदनाचा तिलक लावावा. असं केल्याने कामांमध्ये यश मिळते. असं मानलं जातं की, या तिलकामुळे आपण ज्या कामासाठी जातो ते नक्की पूर्ण होते.

रविवारचा दिवस कोणाशी संबंधित आहे?

रविवारचा दिवस सूर्यदेवाशी संबंधित आहे.

सूर्यदेवाला अर्घ्य देताना कोणते मंत्र जपावे?

“ॐ सूर्याय नमः” किंवा “ॐ आदित्याय नमः” हे मंत्र जपावेत.

रविवारी कोणता व्यायाम फायदेशीर मानला जातो?

रविवारी सूर्य नमस्कार करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

रविवारी कोणत्या वस्तूंचे दान करावे?

गूळ, तांदूळ, दूध, लाल कपडे किंवा तांब्याची भांडी दान करावी.

घरात कोणत्या ठिकाणी दिवा लावावा?

घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना दिवा लावावा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: भाऊच्या धक्क्याकडे जाणऱ्या प्रवासी बोटीचा अपघात; नेव्हीच्या स्पीड बोटची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT