Guruwar che Upay saam tv
लाईफस्टाईल

Guruwar che Upay: गुरुवारच्या दिवशी करा हे ५ सोपे उपाय; भगवान विष्णू उघडतील नशीबाचे दरवाजे

Thursday Vishnu remedies: हिंदू धर्मात प्रत्येक वाराला विशिष्ट देवतेला समर्पित केले आहे. गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांना समर्पित आहे. या दिवशी विष्णू देवाची पूजा आणि काही विशेष उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केलेला असतो. त्यानुसार गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंना समर्पित मानला जातो. या दिवशी जर भक्तीनं आणि विधीने भगवान विष्णूंचं पूजन, व्रत आणि दान केलं तर आयुष्यात बुद्धी, वाणी आणि व्यवसायात प्रगती होते, अशी मान्यता आहे.

अग्निपुराणात आणि स्कंदपुराणात सांगितलं आहे की, देवगुरू बृहस्पतिंनी काशीमध्ये शिवलिंगाची स्थापना करून कठोर तपस्या केली होती. म्हणूनच गुरुवारी केवळ विष्णू नव्हे तर बृहस्पती देवांची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे. गुरुवारच्या दिवशी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ते पाहूयात.

व्रत पाळा

अग्निपुराण आणि स्कंदपुराणानुसार, गुरुवारी व्रत केल्याने धन, समाधान, संततीसौख्य आणि शांततेचं फळ मिळतं. हे व्रत कुठल्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारपासून सुरू करू शकता आणि ते सतत १६ गुरुवार करावं. मुख्य म्हणजे व्रताच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.

विष्णूंना हळद अर्पण करा

अभ्यासात मन लागत नसेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. या दिवशी भगवान विष्णूंना हळद अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होतात आणि पुण्य लाभतं. याच दिवशी विद्येचं पूजन केल्यास ज्ञान आणि समज वाढते.

अन्नदान

गुरुवारच्या दिवशी गोरगरीब किंवा गरजू व्यक्तींना अन्न आणि पैशाचं दान केल्यास मोठं पुण्य प्राप्त होण्यास मदत होते असं मानल जातं. या दिवशी केलेलं दान विशेष शुभ फल देणारं मानलं जातं.

केळ्याच्या पानांची पूजा

हिंदू परंपरेनुसार केळ्याच्या पानांमध्ये भगवान विष्णूंचं वास्तव्य मानलं जातं. म्हणूनच गुरुवारी केळ्याच्या पानांची पूजा केली जाते. काहीजण केळ्याच्या झाडालाही पुजतात. त्याच्या मुळाशी जल, गोडधोड आणि डाळ ठेवतात.

व्रत कसं करावं?

  • गुरुवारी व्रत सुरू करायचं असल्यास सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करा.

  • त्यानंतर मंदिर किंवा घरातील पूजास्थळ स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्धता आणा.

  • एका पाटावर स्वच्छ कपडा अंथरून त्यावर पूजेचं साहित्य ठेवा.

  • भगवान विष्णूचं मनोपूर्वक ध्यान करा आणि व्रताचं संकल्प घ्या.

  • त्यानंतर केळ्याच्या झाडाच्या मुळाशी चण्याची डाळ, मुनक्का (किशमिश) आणि गूळ अर्पण करा.

  • दिवा लावून पूजा करा, गुरुवारची व्रतकथा ऐका किंवा वाचा, आणि शेवटी बृहस्पती देवाची आरती करा.

  • पूजा झाल्यावर आरतीचं आचमन करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT