Ganesh Chaturthi 2025 saam tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीच्या दिवशी करा 'हे' ५ सोपे उपाय; घरात सुख शांती सह पैसाही येईल

Ganesh Chaturthi 2025 Upay in Marathi: गणेश चतुर्थी हा सण गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी भक्त गणपतीची स्थापना करतात आणि मनोभावे पूजा करतात. गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते, कारण ते आपल्या भक्तांचे सर्व अडथळे आणि दुःख दूर करतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ रोजी आहे.

  • शुभ मुहूर्त सकाळी ११:०५ ते दुपारी १:४० आहे.

  • ईशान्य दिशेला दीपक लावावा.

गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक मोठा आणि प्रमुख सण मानला जातो. हा दिवस भगवान गणपतीच्या जन्मदिनाच्या उत्सवाप्रित्यर्थ साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला येतो. यावर्षी गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ रोजी बुधवारच्या दिवशी आहे.

या दिवशी भक्त घरी किंवा सार्वजनिक मंडपांत गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करून विधीपूर्वक पूजा करतात. हा फक्त उत्सवाचा दिवस नसून आनंद, सकारात्मक ऊर्जा, कुटुंबातील सुख-शांती आणि अडथळ्यांचे निवारण यांचे प्रतीक मानला जातो. आजच्या दिवशी खास काही उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील संकटं दूर होण्यास मदत होऊ शकते.

गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त

यावर्षी गणपतीची मूर्ती स्थापनेसाठी सर्वात उत्तम वेळ सकाळी ११:०५ ते दुपारी १:४० असा आहे. या मुहूर्तावर पूजा-अर्चना केल्यास बाप्पाची कृपा जास्त प्रमाणात मिळते. यावर्षी पूजेदरम्यान चार विशेष योग जुळून येत आहेत. यामध्ये शुभ योग, शुक्ल योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग यांचा समावेश आहे.

गणेश चतुर्थीला करावेत हे सोपे उपाय

दीपक लावा

घराच्या ईशान्य दिशेला दीपक लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नकारात्मक शक्ती दूर होतात आणि माता लक्ष्मीची कृपा मिळून धनवृद्धी होते.

मोदक अर्पण करा

गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहे. त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवल्याने जीवनातील अडचणी कमी होतात आणि घरात सुख-शांती नांदते.

दुर्वा अर्पण करा

गणपती बाप्पाला दुर्वा खूप प्रिय आहे. त्यांच्या मस्तकावर दुर्वा चढवल्यास बाप्पाची विशेष कृपा लाभते.

गणेश स्तोत्र पठण करा

मनापासून गणेश स्तोत्राचे पठण केल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होते आणि धनलाभाचे योग जुळतात.

लवंग-कापूर आहुती द्या

कुटुंबावर वाईट नजरेचा प्रभाव पडू नये यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या समोर दोन कपूर आणि सहा लवंग टाकून आहुती द्या. आहुतीची ज्योत सर्वांनी कपाळाला स्पर्श करावी.

गणेश चतुर्थी २०२५ मध्ये कोणत्या तारखेला आहे?

गणेश चतुर्थी २०२५ मध्ये २७ ऑगस्ट रोजी आहे.

गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे?

सकाळी ११:०५ ते दुपारी १:४० हा शुभ मुहूर्त आहे.

घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोणती दिशा महत्त्वाची आहे?

घराच्या ईशान्य दिशेला दीपक लावावा.

गणपतीला कोणता नैवेद्य अत्यंत प्रिय आहे?

गणपतीला मोदक अत्यंत प्रिय आहे.

कुटुंबावर वाईट नजरेपासून संरक्षण मिळवण्यासाठी काय करावे?

लवंग आणि कपूरची आहुती द्यावी.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT