Ravivar che Upay saam tv
लाईफस्टाईल

Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी सकाळी करा हे 4 उपाय; सूर्यदेव करतील पितृदोष दूर

Sunday remedies for Sun God: ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत सूर्य ग्रह मजबूत असल्यास व्यक्तीचे जीवन यशस्वी होते, पण सूर्य कमजोर असल्यास अनेक समस्या येतात. याशिवाय, पितृदोष (Pitru Dosh) दूर करण्यासाठीही रविवारचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

  • रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो.

  • सूर्याला अर्घ्य देणे आरोग्य आणि यशासाठी फायदेशीर आहे.

  • तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन अर्घ्य द्यावे.

हिंदू धर्मात आठवड्याचे प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित मानले आहेत. त्यापैकी रविवार हा दिवस सूर्यदेवतेसाठी विशेष मानला जातो. सूर्यदेव शक्ती, सामर्थ्य आणि यशाचं प्रतीक आहेत. असं मानण्यात येतं की, जर आपण रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात केली, तर आयुष्यात सुख-समृद्धी नांदते आणि कीर्ती तसंच यश लाभतं.

सूर्यदेवाची पूजा करण्याचे फायदे

सूर्यदेवतेची नियमित पूजा केल्यास जीवनात अनेक सकारात्मक बदल जाणवतात. विशेषतः रविवारच्या दिवशी केलेले उपाय अत्यंत फलदायी ठरतात. असं मानण्यात येतं की, या उपायांमुळे पितृदोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे घरात शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते.

रविवारचे चमत्कारी उपाय

सकाळी लवकर उठणं

रविवारच्या दिवशी सकाळी शक्यतो लवकर उठलं पाहिजे. सूर्योदयाच्या आधीचा काळ अध्यात्म आणि उर्जेच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानला जातो.

उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या

या दिवशी तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घ्यावं. त्यात रोली (कुंकू), लाल फुलं, तांदूळ आणि थोडेसे लाल चंदन टाकावं. हे जल उगवत्या सूर्याला अर्पण केल्यास सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि पितृदोष दूर होतो.

सूर्य मंत्रांचा जप करा

सूर्यदेवाला अर्घ्य देताना त्यांच्या मंत्रांचा जप अवश्य करावा –

“ॐ आदित्याय नमः”

“ॐ सूर्याय नमः”

हे मंत्र उच्चारल्याने मनःशांती मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात.

पितरांसाठी दिवा अवश्य लावा

रविवारी पितरांच्या स्मरणार्थ घराच्या पूर्व किंवा दक्षिण दिशेला एक दिवा लावावा. या दिव्यात तिळाचं तेल किंवा शुद्ध तूप घालावं. दिवा लावताना आपल्या पितरांचे मनोभावे स्मरण करून प्रार्थना करावी.

रविवारचा दिवस कोणाला समर्पित आहे?

रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे

सूर्याला अर्घ्य देण्यासाठी कोणता भांड्याचा वापर करावा?

तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन अर्घ्य द्यावे.

सूर्याला अर्घ्य देताना कोणते मंत्र म्हणावेत?

“ॐ आदित्याय नमः” आणि “ॐ सूर्याय नमः” हे मंत्र म्हणावेत.

पितृदोष दूर करण्यासाठी रविवारी काय करावे?

पितरांच्या स्मरणार्थ दिवा लावावा.

रविवारी सूर्याला अर्घ्य देण्याचा शुभ वेळ कोणता?

सूर्योदयाच्या आधीचा काळ शुभ मानला जातो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Coach: मुंबई इंडियन्सला मिळला नवीन कोच; 'या' अनुभवी खेळाडूवर संघाची जबाबदारी

Election Commission: मतमोजणीच्या नियमात बदल, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय

Sambhaji Bhide: दांडिया खेळणं म्हणजे नपुंसकता; संभाजी भिडेंच्या वक्तव्याने महाराष्ट्रात पेटला वाद

Rahul Gandhi : तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत; मामा पगारेंना थेट राहुल गांधींचा फोन, VIDEO

Farmers in Marathwada: आभाळाचं क्रूर रूप! अतिवृष्टीने पिकं आणि आशा दोन्ही वाहून घेतली,बळीराज्याने फोडला टाहो

SCROLL FOR NEXT