Pregnancy Guide saam tv
लाईफस्टाईल

Pregnancy Guide: गर्भवती महिलांना खरंच दुप्पट भूक लागते? महिलांनी कसा घ्यावा आहार, तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

Pregnancy Guide: अनेक वेळा असं घडतं की, गर्भवती महिलांना खूप भूक लागते. अशावेळी भूक लागली की गर्भवती महिला खाऊ लागतात. यामागे हार्मोनल बदल देखील असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

आई होणं हा एका महिलेसाठी तिच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा घटक असतो. गर्भवती असताना महिलांच्या शरीरात अनेक वेगळे बदल होतात. याशिवाय त्यांच्या काही सवयींमध्येही बदल होतो. यामध्ये अनेक वेळा असं घडतं की, गर्भवती महिलांना खूप भूक लागते. अशावेळी भूक लागली की गर्भवती महिला खाऊ लागतात. यामागे हार्मोनल बदल देखील असू शकतात.

गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीतील चढ-उतारामुळे गर्भधारणेदरम्यान गर्भ, प्लेसेंटा आणि रक्ताचे प्रमाण 100% पर्यंत वाढू शकतं. मात्र गर्भधारणेदरम्यान महिलांना जास्त प्रमाणात भूक का लागते, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिलीये.

गर्भारपणात दुप्पट आहाराची गरज?

पुण्यातील मदरहूड हॉस्पिटलमधील सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्वाती गायकवाड यांनी सांगितलं की, प्रत्येक गर्भवती महिलेने गरोदरपणात पौष्टिक आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गर्भातील बाळाचा विकास योग्य प्रकारे होतो. गरोदरपणाच्या सर्व त्रैमासिकांमध्ये दुप्पट खाण्याची गरज नाही. परंतु आहारात पोषक तत्वांचा संतुलित प्रमाणात समावेश करणं आवश्यक आहे. या दिवसांमध्ये लोहयुक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे. जसजसं रक्त पातळ होतं तसतसं हिमोग्लोबिन थोडं कमी होतं. अशा स्थितीत आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड असलेल्या गोष्टींचे सेवन करावे.

भूक लागल्यावर कसा घ्याल आहार?

  • दोन जेवणांमध्ये जास्त अंतर ठेवू नका आणि एकाच वेळी जास्त खाणे देखील टाळा.

  • गर्भधारणेदरम्यान आवश्यक पोषण तुम्हाला गर्भधारणेच्या संपूर्ण 9 महिन्यांच्या काळात निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला अशक्तपणा किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक समस्या नसावी.

  • तुमच्या आहारात कॅल्शियम, लोह, फोलेट (फॉलिक ऍसिड), व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी12, प्रथिने यांसारखी जीवनसत्त्वांचा समावेश कारवा. तसंच तुमच्या आहारात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचा समावेश अवश्य करावा.

  • रोज किमान 10 ते 12 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे.

  • तुम्ही भाज्यांचे सूप आणि फळांचा रस देखील घेऊ शकता.

  • गरोदरपणात उपवास करणं टाळा आणि कच्चे दूध पिऊ नका याचा परिणाम बाळावर होतो.

डॉ. स्वाती गायकवाड पुढे म्हणाल्या की, गरोदरपणादरम्यान हार्मोनल बदल प्रचंड प्रमाणात होतात. बाळाची वाढ होण्यासाठी पोषक तत्त्वाचं पुरेसं प्रमाण आवश्यक असतं ती मागणी शरीर करतं, शिवाय चयापचयाची क्रिया वेगवान होते म्हणूनही हे घडतं. मात्र गर्भवतीने दोन जणांसाठीचा आहार घ्यायला हवा ही अतिशय चुकीची समजूत आहे.

विशेषतः पहिल्या तीन महिन्यांमध्ये बऱ्याच वेळा गर्भवतीला उलटी, मळमळीचा त्रास होतो आणि नेहमीचे जेवणही जात नाही. अशावेळी तिला जे खावंसं वाटेल ते तिने खाल्ल्यास हरकत नाही. मात्र शीतपेये, अजिनोमोटो असलेले चायनीज पदार्थ, अति प्रमाणात साखर, preservatives असलेले फळांचे रस, बाजारातील तयार आणि जंक फूड्स या गोष्टी टाळलेल्या बऱ्या. गर्भवतीने जेवढी भूक असेल तेवढेच खावं. घरच्यांनी खाण्याचा अतिआग्रह करू नये.

गर्भारपणात पचनक्रिया मंदावते

गरोदर असताना, तुमचे शरीर प्रोजेस्टेरॉनचे उत्सर्जन करते, हे संप्रेरक तुमची पचनक्रिया मंद करतात, ज्यामुळे नेहमीपेक्षा जास्त वायू, पोट फुगणे,सतत ढेकर येणे अशा समस्या जाणवतात. पहिल्या तिमाहीत गर्भाशयाचा विस्तार होत असून त्यामुळे पचन मंदावते आणि पोटावर दबाव येतो, ज्यामुळे खाल्ल्यानंतर आणखी फुगल्यासारखे वाटते. म्हणूनच गर्भधारणेदरम्यान छातीत जळजळ किंवा बद्धकोष्ठतादेखील होऊ शकते. तुम्हाला पूर्वी कधीही हा त्रास झाला नसेल तरी गर्भधारणेदरम्यान असा त्रास होऊ शकतो. गॅस आणि पोट फुगण्यास कारणीभूत ठकणारे पदार्थांचे सेवन टाळावं, असंही डॉ. गायकवाड यांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT