Saturday remedies for wealth saam tv
लाईफस्टाईल

Shaniwar che Upay: शनिवारच्या दिवशी करा फक्त 'ही' ४ कामं; शनिदेवाच्या कृपेने संपत्ती वाढण्यास होणार मदत

Saturday remedies for wealth: शनिवार हा दिवस न्यायदेवता आणि कर्मफल दाता शनिदेवांना (Shani Dev) समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • शनिवार हा शनिदेवाच्या उपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • पिंपळाच्या पानांवर मिठाई अर्पण करावी.

  • उडीद, काळे हरभरे किंवा बाजरीचे दान फायदेशीर आहे.

शनिवारचा दिवस शनिदेवाची उपासना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. शास्त्रांनुसार जर शनिदेव प्रसन्न झाले तर ते भक्तावर धनाचा वर्षाव केला जातो. जीवनात झपाट्याने प्रगती घडवून आणतात.

असं म्हणतात की, शनिदोष दूर करण्यासाठी आणि जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी शनिवारच्या दिवशी काही खास उपाय केल्यास मोठा लाभ होतो. चला तर मग जाणून घेऊया शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत. या उपायांनी काय फरक पडू शकतो हे देखील जाणून घेऊया.

पिंपळाच्या पानांचा उपाय

शनिवारी सकाळी स्नान करून शनिदेवाची पूजा करा. त्यानंतर पीपळाच्या पाच पानांवर वेगवेगळ्या रंगांची पाच मिठाई ठेवा. मनात आपल्या पितरांचं स्मरण करा आणि त्या मिठाया व पानं शनिदेवाला अर्पण करा. असं केल्याने पितर प्रसन्न होतात आणि घराला धन-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो.

दान करण्याचा उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी गरजू लोकांना उडीद, काळे हरभरे किंवा बाजरीचे दान करणं अत्यंत शुभ मानण्यात येतं. असं दान केल्याने आयुष्यात धन आणि सुख-समृद्धी टिकून राहण्यास मदत होते. मात्र शनिवारी कधीही गव्हाचे पीठ दान करू नये, कारण त्यामुळे अडचणी वाढू शकतात.

शनिस्तोत्राचे वाचन

शनिवारी जर ११ वेळा शनिस्तोत्राचं पठण केले तर जीवनातील अनेक अडथळे दूर होतात आणि घरातील नकारात्मकता कमी होते. सकाळी लवकर स्नान करून शनिदेवाची पूजा करा आणि नंतर शनिस्तोत्राचं वाचन करा. सायंकाळी प्रदोषकाळातही ११ वेळा पठण केल्यास विशेष लाभ मिळू शकतो.

सफाई कर्मचाऱ्यांना धन दान करणं

शनिवारच्या दिवशी एखाद्या सफाई कर्मचाऱ्याला धनाचं दान केल्यास ते अत्यंत पुण्यकारक ठरते. या उपायामुळे आर्थिक समस्यांवर मात करता येते आणि भाग्य उजळते. व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती मिळते. या उपायामुळे घरात सदैव सुख-समृद्धीचे वातावरण राहते.

शनिवारचा दिवस कोणाला अर्पित आहे?

शनिवारचा दिवस शनिदेवाला अर्पित आहे.

पितृप्रीतीसाठी कोणता उपाय करावा?

पिंपळाच्या पानांवर मिठाई ठेवून शनिदेवाला अर्पण करावी.

शनिवारी कोणते दान शुभ मानले जाते?

उडीद, काळे हरभरे किंवा बाजरीचे दान शुभ मानले जाते.

शनिस्तोत्राचे पठण किती वेळा करावे?

शनिस्तोत्राचे पठण किमान ११ वेळा करावे.

सफाई कर्मचाऱ्याला धनदान देण्याचा काय फायदा आहे?

आर्थिक समस्या कमी होऊन भाग्य उजळते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT