Taught Children About Good Touch Bad Touch  google
लाईफस्टाईल

Good Touch Bad Touch : या '3' भागांना कोणालाही हात लावू देऊ नका; लहान मुलांसोबतचा आमिरचा Video होतोय व्हायरल

Taught Children About Good Touch Bad Touch : बदलापूरमधील घटलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेले दिसले.अशातच आमिर खानच्या एका व्हिडिओची छोटी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिलांवरील बलात्कार आणि बालकांवरील लैंगिक शोषण यांचं प्रमाण सध्या देशात वाढताना दिसतंय. काही दिवसांपूर्वी कोलकात्याच्या आरजी मेडिकल कॉलेज महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कारानंतर बदलापूरमधील दोन चार वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात वातावरण आहे.

बदलापूरमधील घटलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेले दिसले. या घटनेनंतर आता प्रत्येक पालकाच्या मनात आपल्या मुलींच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुली शाळेत सुरक्षित नसतील तर त्या कुठे सुरक्षित असतील असा संतप्त सवाल पालकांद्वारे उपस्थित करण्यात येतोय. यासंदर्भात अनेक ठिकाणी आंदोलन करत आरोपीच्या फाशीचीही मागणी करण्यात आली.

दरम्यान, दुसरीकडे आमिर खानच्या एका व्हिडिओची छोटी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते. या व्हिडीओ जुन्या एका शोमधील असून तो लहान मुलांना गुड टच आणि बॅड टचबद्दल माहिती देतोय.

आमिर खान मुलांना कसं समजावतोय?

आमिर खानचा हा शो चांगलाच गाजला होता. या शोच्या एका एपिसोडमध्ये, आमिर एका फोटोद्वारे मुलांना गुड टच आणि बॅड टचबाबत समजावून सांगतो. यावेळी आमिर सांगतो की, पालकांव्यतिरिक्त लहान मुलांनी इतर कोणत्याही व्यक्तीला शरीराच्या तीन भागांना स्पर्श करू देऊ नये - छाती, पायांच्या मधील भाग आणि कमरेच्या खालील भाग म्हणजेच बॉटम.

आमिर त्या मुलांना या व्हिडीओमध्ये पुढे माहिती देतो की, अंघोळ घालताना तुमचे पालक तुम्हाला या ठिकाणी स्पर्श करू शकतात. तसंच तुमचे डॉक्टर तपासणीदरम्यान तुम्हाला या ३ ठिकाणी स्पर्श करू शकतात. मात्र डॉक्टर पण तुमच्या आई-वडिलांच्या अनुपस्थितीत इथं डॉक्टरही तुम्हाला हात लावू शकत नाहीत. त्याला या तीन धोकादायक शरीरावरील भागांना हात लावण्याची परवानगी नाही.

आमिरच्या सांगण्यांनुसार, जर कोणीही तुम्हाला या डेंजर जागी टच करेल तर तुम्हाला अजिबात घाबरायचं नाही. तुमच्यासोबत अशी घटना घडल्यास तुम्ही मोठ्याने ओरडा. याशिवाय असं घडल्यास ताबडतोब घरी पळा किंवा सुरक्षित ठिकाणी जा.

सध्या आमिर खानची हा व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जातोय. दरम्यान प्रत्येक पालकांनी आपल्या शाळकरी मुलांना गुड टच आणि बॅड टचबाबत माहिती दिली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

SCROLL FOR NEXT