Weather Update: पुढील 3 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, पुणे आणि साताऱ्यासाठी रेड अलर्ट

Maharashtra Weather Update: हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला.
Weather Update: पुढील 3 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, पुणे आणि साताऱ्यासाठी रेड अलर्ट
Published On

पुढील 3 तासांत रायगड, रत्नागिरी येथील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात देखील अतिवृष्टीचा होईल, अशी शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

तसेच मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी, काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. राज्यातील इतर जिल्हे संभाजीनगर, जालना, अकोला आणि अमरावती, गर, जळगाव आणि कोल्हापुरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

नाशिक जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली असून त्र्यंबकेश्वर इगतपुरीमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. शुक्रवारच्या संध्याकाळ ७ वाजल्यापासून मुसळधार पाऊस त्र्यंबकेश्वरमध्ये होत आहे. मुसळधार पावसामुळे शहरात गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण झालीय. शहरातील मेन रोड, तेली गल्लीसह अन्य काही भागात पुराच पाणी शिरलंय. बाजारपेठेतील रस्त्यांना नदीचं स्वरूप आले आहे. तर इगतपुरी शहरातही शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. शहरातील सखल भागात पावसाचं पाणी साचलं. तर शहरातील खालची पेठ परिसरात असलेल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. या मुसळधार पावसानं इगतपुरीतील जनजीवन विस्कळीत झालंय.

नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित झाले आहेत अंकलेश्वर ब्रहानपूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहणारी वरखेडी नदी धोक्याची पातळी ओलांडली असून दुथडी भरून वाहत आहे आणखीन काही तास पाऊस असाच सुरू राहिला तर अंकलेश्वर ब्रहानपूर महामार्ग ठप्प होणार त्यासोबत वरखडी नदीला लागून असलेल्या अनेक गावांच्या संपर्क देखील तुटणार आहे पावसामुळे वाहतूक कोंडी देखील होत असून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात देखील पाणी पातळी वाढ होत आहे त्यासोबत जिल्ह्यातील धरणांची देखील पाणी पातळी प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून येत आहे येणाऱ्या आणखी काही तास असाच पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे.

Weather Update: पुढील 3 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, पुणे आणि साताऱ्यासाठी रेड अलर्ट
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट; मराठवाडा-विदर्भात तुफान पाऊस कोसळणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com