Parenting Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : लहान मुलांच्या रूममध्ये 'या' गोष्टी ठेवू नका, अन्यथा येईल पश्चात्तापाची वेळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Parenting Tips : अनेक पालक त्यांच्या लहान मुलांचे बेडरुम चांगल्या प्रकारे डेकोरेट करतात. अशातच रूम डेकोरेशनमध्ये पालक त्यांच्या मुलांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून काम करतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की लहान मुलांच्या रूममध्ये या गोष्टी ठेवणे हानिकारक ठरू शकते.

तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी असेल तर लहान मुलांच्या (Children) रूममध्ये या आठ गोष्टी कधीच ठेवू नका. लहान मुलांच्या गरजेनुसार पालक सगळ्या गोष्टी लहान मुलांच्या रूममध्ये ठेवतात. परंतु बऱ्याचदा लहान मुलांना या गोष्टींमुळे इजा होऊ शकते. चला तर मग पाहूया लहान मुलांच्या रूममध्ये कोणत्या गोष्टी चुकून सुद्धा ठेवायच्या नाहीत.

1. काचेचे सामान ठेवू नये -

लहान मुलांच्या रूममध्ये काचेच्या वस्तू अजिबात ठेवू नये. लहान मुलांचं रूम सजवायचा म्हणल्यावर अनेक लोक काचेची आणि चिनी मातीची भांडी रूम डेकोरेशन साठी वापरतात. परंतु असं करणार अत्यंत चुकीचं आहे. चिनी मातेची किंवा काचेची भांडी फुटल्यावर लहान मुलांना खर्चटू शकते. मुळे अशी चूक चुकून सुद्धा करू नका.

2. लाऊड टॉय देऊ नये -

रडत असलेल्या लहान मुलाला शांत करण्यासाठी बरेच पालक (Parents) त्यांच्यासमोर आवाज करणारी खेळणी खेळायला देतात. परंतु लहान मुलांचे कान अतिशय सेंसिटिव असतात. अशातच लाऊड साऊंड असणारी खेळणी त्यांच्या आजूबाजूला ठेवू नये.

3. कैची, नेल कट्टर सारख्या वस्तू ठेवू नये -

कैची, नीलकटर्स, स्क्रू ड्रायव्हर, सुरी अशा धारदार शस्त्रांपासून लहान मुलांना लांबच ठेवा. त्यांच्या रूममध्ये चुकून सुद्धा अशाप्रकारची धारदार वस्तू ठेवू नका. नाहीतर लहान मुलांचा हात कापू शकतो. किंवा दुसरी सुद्धा ही विधाने होऊ शकते.

4. गोळ्या औषधे दूर ठेवा -

लहान मुलं खेळता खेळता बऱ्याचदा तोंडामध्ये हात टाकतात. खाली पडलेलं काही उचलून खातात. अशातच तुम्ही तुमच्या लहान मुलांची काळजी घेताना त्यांच्या आसपास औषधे अजिबात ठेवू नका. नाहीतर तुम्हाला त्याचे विपरीत परिणाम पाहायला मिळतील.

5. कोणत्याही प्रकारचे फर्निचर ठेवू नका -

बरेच पालक आपल्या लहान मुलाला खुश करण्यासाठी हलणारे फर्निचर किंवा झोक्यासारखे काही हँगिंग टॉय आणतात. परंतु तुमचं लक्ष नसल्याने तुमची बाळ झोक्यावरून खाली पडू शकते. त्यामुळे अशा गोष्टींपासून लांबच राहा.

6. इलेक्ट्रॉनिक वस्तू लांब ठेवा -

मुलं बऱ्याचदा रूम मध्ये असलेले वायर खेचतात. त्याचबरोबर स्विच बोर्ड वरती हात मारतात. पण असं केल्याने त्यांना करंट लागू शकतो. म्हणूनच इलेक्ट्रॉनिक गॅझेट लहान मुलांपासून लांबच ठेवा. त्याचबरोबर स्विच बोर्ड आणि पावर प्लगवरती टेप चीपकवा. त्यामुळे लहान मुलं पूर्णपणे सुरक्षित राहतील.

7. बेबी वॉकर लांब ठेवा -

लहान मुलांना चालण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी पालक बेबी वॉकर आणतात. परंतु हे बेबी वॉकर मध्ये कधीच ठेवू नये. यामुळे तुमच्या लहान मुलाला धक्का लागून तो खाली पडू शकतो. त्यामुळे लहान मुलासोबत बेबी वॉकर कधीच एकटे सोडू नका.

8. छोट्या रोपट्यांमुळे होऊ शकते एलर्जी -

लहान बाळांच्या रूममध्ये एक छान वाइब येण्यासाठी अनेक पालक रूममध्ये लहान लहान प्लांट्स लावतात. परंतु अशा प्लांट्स मुळे तुमच्या लहान मुलाला एलर्जी होऊ शकते. त्याचबरोबर इन्फेक्शनचा खतरा वाढू शकतो. त्यामुळे एलर्जी टेस्ट करून झाल्यावर घरामध्ये डान्स लावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT