रोजच्या धावपळीच्या जीवनात नागरिकांना आपल्या आरोग्यावर लक्ष देण्यास अजिबात वेळ मिळत नाही. त्यामुळे सर्वजण झटपट काही पदार्थ खायचे असल्यास ब्रेड, टोस्ट चहासोबत खातात. सकाळच्या चहाबरोबर काही खाल्ल्यास दुपारच्या जेवणापर्यंत पोट भरलेलं राहतं असं म्हणतात.
त्यामुळे अनेकजण नाश्त्यामध्ये चहा आणि चपाती खाणे पसंत करतात. चपातीला जॅम किंवा बटर लावल्यानंतर काही जण चहासोबत चपाती खातात. मात्र चहा चपाती खाल्ल्याने याचे आपल्या आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात. त्यामुळे आज त्याच परिणामांची माहिती या बातमीतून जाणून घेऊ.
वजन वाढते
ज्या ज्या व्यक्ती चहासोबत चपाती खातात त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यासह चपातीमुळे कॅलरीज देखील वाढतात. सकाळी हलका आहार घ्यायचा असतो. मात्र जर तुम्ही सकाळीच दमदार चहा-चपाती खाल तर तुमचं वजन जास्त प्रमाणात वाढेल. वजन कमी होण्यास अडचणी येतील.
पोषक तत्व कमी होणे
चहा चपाती हे कॉम्बीनेशन फार वेगळं आहे. आहारात याचा समावेश असल्यास शरीराला सकाळी पुरेसे पोशक तत्व मिळत नाहीत. आपण फक्त जाड होत जातो. शरीराला पोषक तत्व न मिळता फक्त चरबी वाढते.
झोप कमी होते
चहा चपाती खाणाऱ्या व्यक्ती चहामध्ये जास्तप्रमाणात चहापावडर टाकतात. चहा पिल्याने भूक लागत नाही. शिवाय यातील कॅफेन आपली झोपही कमी करतं. चहा चपातीचं सेवन करणाऱ्या व्यक्तींना रात्रीच्यावेळी लवकर झोप लागत नाही. झोप पूर्ण न झाल्याने संपूर्ण दिवस खराब जातो.
मळमळ होते
काही व्यक्तींना चहा चपातीचं सेवन केल्याने मळमळ देखील होते. चहा चपाती म्हणजे कॅफेनसोबत गव्हाचं पीठ हे कॉम्बीनेशन फार वेगळं आहे. यामुळे डोकेदुखीच्या समस्या देखील वाढत जातात.
सकाळच्या नाश्त्यात तुम्ही देखील चहा चपाती खात असाल तर आजच बंद करा. त्या ऐवजी फळं, किंवा पोहे, उपमा असे पदार्थ खा.
टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही याचं समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.