मुंबई : सायबर गुन्हेगार (Cyber Crime) नागरिकांनी फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया शोधून काढतात. त्यामुळे आपली फसवणूक टाळायची असेल तर सायबर ठगांच्या एक पाऊल पुढे जाऊन विचार करण्याची नागरिकांना गरज आहे. अन्यथा आपण त्यांच्या जाळ्यात अडकून लाखोचं नुकसान करुन घेऊ शकतो. अशी एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये मोबाईल चार्जिंगला लावताच बँक खात्यातून लाखो रुपये गायब झाले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज (Mobile Charging) करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अनेकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये ज्यूस जॅकिंगच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. ज्यूस जॅकिंग हा एक प्रकारचा सायबर किंवा व्हायरस हल्ला आहे. यामध्ये गुन्हेगार विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा मॉल अशा सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या यूएसबी चार्जिंग पोर्टद्वारे कोणत्याही मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट किंवा अन्य डिव्हाईसवर मालवेअर (ज्यूस जॅकिंग) बसवून पर्सनल डेटा चोरतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच हैदराबादमधील एका कंपनीचे सीईओ सार्वजनिक ठिकाणी यूएसबी पोर्टद्वारे आपला मोबाइल चार्ज करत होते. यानंतर त्याच्या खात्यातून 16 लाख रुपये काढण्यात आल्याचे समोर आले. दिल्लीतही यापूर्वी एका महिलेने दिल्ली विमानतळावर असलेल्या यूएसबी चार्जिंग स्टेशनवर फोन चार्ज होत असल्याची तक्रार केली होती. यादरम्यान त्यांच्या खात्यातून एक लाख 20 हजार रुपये काढण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना आता योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
ज्यूस जॅकिंगमध्ये एखादी व्यक्ती जेव्हा सार्वजनिक ठिकाणी आपला मोबाईल चार्जिंगला लावते त्यावेळी त्याच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर सायबर अटॅक केला जातो. दोन मार्गांनी हे काम केले जाऊ शकतो. एकतर चार्जिंग केबल किंवा यूएसबी डेटा केबलच्या माध्यमातून हा सायबर हल्ला होऊ शकतो.
अनेकजण रेल्वे स्टेशन, विमानतळ जिथे शक्य असेल तिथे आपला मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करुन घेतात. मात्र त्यांच्यासाठी हे एकप्रकारे जाळं असतं. एकदा ते या जाळ्यात अडकले की त्यांची फसवणून पक्की असते.
डिव्हाईस कशाप्रकारे हॅक होतो?
सायबर गुन्हेगार सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग स्टेशन हॅक करतात. तुम्ही तुमचा फोन चार्जिंगसाठी तिथे ठेवताच, तुमच्या फोनच्या USB पोर्टद्वारे तुमच्या फोनमध्ये कोणताही मालवेअर इन्स्टॉल होईल. यामुळे हॅकरला फोनचा अॅक्सेस मिळेल.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये अशा प्रकारचे गुन्हे थांबले होते, मात्र आता बसस्थानक, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि इतर सार्वजनिक ठिकाणी यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. यापूर्वी एसबीआयसह अनेक बँकांनी लोकांना याबाबत सतर्क केले होते. आता गृह मंत्रालयाच्या सायबर युनिटने या संदर्भात एक अॅडव्हायजरी जारी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.