Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: चुकूनही घरामध्ये 'या' ठिकाणी पैसे ठेऊ नका, रातोरात होऊ शकता कंगाल, लक्ष्मी होईल नाराज

Vastu Tips: तुम्ही घरात पैसे ठेवलेल्या जागेचा तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो, हे तुम्हाला माहितीये का?

Surabhi Jayashree Jagdish

घरात सुख शांती नांदावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी आपण वास्तू शास्त्राची मदत घेतो. वास्तू शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीबाबत काही खास नियम देण्यात आले आहे. या नियमांनुसार, या गोष्टी घरात ठेवल्या गेल्या पाहिजेत. यामध्ये तुम्ही घरात पैसे ठेवलेल्या जागेचा तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो, हे तुम्हाला माहितीये का? वास्तुशास्त्रात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये काही ठिकाणं आहेत जिथे पैसे ठेवल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह थांबतो. परिणामी तुमच्या घरी गरीबी, कर्ज आणि अतिरिक्त खर्च यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. वास्तूनुसार अशा ठिकाणांबद्दल जाणून घेऊया, ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवणं टाळलं पाहिजं.

कुठे ठेवाल घरातील तिजोरी?

वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरात असलेली तिजोरी एका विशिष्ट दिशेला ठेवावी. ज्या ठिकाणी तुम्ही तिजोरी ठेवताय त्या ठिकाणी अंधार नसावा. तिजोरी अंधार असलेल्या ठिकाणी ठेवल्यास पैशाची कमतरता आणि घरात आर्थिक समस्या वाढू शकतात. वास्तूशास्त्रात असं मानलं गेलंय की, तिजोरीचं स्थान घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला असलं पाहिजे.

टॉयटेलच्या जवळ ठेऊ नये

घरात पैसे ठेवण्याची जागा जी वास्तुशास्त्रात चुकीची मानली जाते, ती भिंतीजवळ आहे. भिंतीजवळ टॉयलेट किंवा बाथरूम असेल अशा ठिकाणी पैसे ठेवल्यास तुमची आर्थिक हानी होऊ शकते.

या ठिकाणी ठिकाणी पैसे ठेवल्याने पैसा हातात राहत नाही. याशिवाय घरामध्ये आर्थिक संकट आणि पैशाची अव्यवस्था होण्याचा धोका असतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार पैसे ठेवण्यासाठी अशा ठिकाणी टाळलं पाहिजे.

दक्षिण दिशेला पैसे ठेऊ नयेत

दक्षिण दिशेला पैसा ठेवणं देखील वास्तू शास्त्रानुसार चुकीचं मानलं गेलंय. दक्षिण दिशेला यमाचं स्थान मानलं जातं त्यामुळे या ठिकाणी पैसे ठेवल्यास घरामध्ये गरिबी आणि पैशाची कमतरता येऊ शकते. या दिशेला पैसा ठेवल्याने घरात आर्थिक संकट येण्याचा धोकाही असतो.

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये पैसा ठेवण्यासाठी उत्तर, ईशान्य आणि पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते. कारण या दिशा सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुटुंबीय असमाधानी; जरांगे पाटलांची घेणार भेट

SCROLL FOR NEXT