Places To Visit in Diwali Pollution Free Travel Destinations in India - Saam
लाईफस्टाईल

Diwali Travel Plan : गुलाबी थंडी आणि प्रदूषणमुक्त वातावरणात फिरायचे आहे? भारतातील ही ठिकाणं ठरतील बेस्ट

Shraddha Thik

Travel Plan :

दिवाळीच्या दिवशी आणि त्यानंतर हवेची गुणवत्ता खूपच खराब होते. त्यात श्वास घेणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत हवा थोडीशी स्वच्छ असेल अशा ठिकाणी जाणे हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी दिवाळीच्या (Diwali) सुटीत तुम्ही या ठिकाणांचे नियोजन करू शकता.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईसह त्याच्या आसपासच्या शहरांमध्ये बदलत जाणाऱ्या या वातावरणामुळे बऱ्याचदा त्रास होतो. काही लोकांना दमा, मानसिक आणि आरोग्यांच्या (Health) समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या रुग्णालयांमध्ये श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्यांची संख्या सातत्याने वाढत असून दिवाळीच्या काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होईल असे दिसते.

अशा स्थितीत काही दिवस मोकळा श्वास घ्यायचा असेल तर अशा शहरांना भेट द्या, जिथे प्रत्येक ऋतूत आणि सणासुदीला हवा पूर्णपणे स्वच्छ (Clean) राहते. दिवाळी यावेळी वीकेंडला येत आहे. तुम्ही शुक्रवार ऑफिस नंतर निघू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही शहरे प्रेक्षणीय स्थळांसाठीही उत्तम आहेत. या यादीत कोणती ठिकाणे समाविष्ट आहेत ते पाहूयात.

मंगलोर

मंगळूरचा समावेश प्रत्येक प्रवाशाच्या यादीत नक्कीच झाला पाहिजे. प्रेक्षणीय समुद्रकिनाऱ्यांपासून ते प्राचीन मंदिरे आणि चर्च, अप्रतिम वास्तुकला आणि पाहण्यासारखे बंदर, सर्व काही मंगलोरला भेट देण्यासारखे बनवते. या शहराला कर्नाटकचा एंट्री पॉइंट देखील म्हणतात, त्यामुळे तुम्ही दिवाळीत मंगळुरूची योजना करू शकता. या शहरात हिरवाई, आधुनिक वास्तू, समुद्रकिनारा, मंदिरे अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.

गंगटोक

सिक्कीम हे भारतातील अतिशय सुंदर ठिकाण आहे, त्यामुळे जर तुम्हाला काही दिवस हवेत मोकळा श्वास घ्यायचा असेल, तर गंगटोक या शहराची योजना करा. इथे तुम्हाला हवेत एक वेगळाच ताजेपणा जाणवेल. भारतातील सर्वात कमी प्रदूषित शहरांपैकी गंगटोकमध्ये भेट देण्याच्या ठिकाणांची कमतरता नाही.

पाँडिचेरी

तामिळनाडूतील पाँडिचेरी शहर तुम्हाला भारताबाहेरील शहरात फिरत असल्याचा भास होतो. या शहरात एक वेगळेच सौंदर्य आणि शांतता पाहायला मिळते. हे शहर त्याच्या खास वास्तुकलेसाठी ओळखले जाते. काही दिवस स्वच्छ हवेचा श्वास घेण्याव्यतिरिक्त, तुम्ही येथे येऊ शकता आणि कोरल बीचवर सर्फिंग आणि डायव्हिंगसारख्या अॅक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता.

किन्नौर

हिमाचल प्रदेशातील बहुतेक शहरांमध्ये अफाट सौंदर्य आहे. तुम्ही इथे कोणत्याही शहरात येण्याचा प्लान करू शकता, पण किन्नौर शहर हे इथले सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. जिथे तुम्ही काही दिवस स्वच्छ हवा श्वास घेऊ शकता आणि प्रवासाचा आनंद देखील घेऊ शकता. निसर्गाचे जवळून निरीक्षण करण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

कोल्लम

केरळमधील कोल्लम शहर आपल्या सौंदर्य आणि स्वच्छ हवेसाठी देखील ओळखले जाते. केरळला भेट देण्याचा मोसम सुरू झाला आहे, त्यामुळे तुम्हाला इथे गर्दी पाहायला मिळेल, पण या शहरात प्रदूषण होणार नाही हे निश्चित. त्यामुळे यावेळी इथे येऊन दिवाळी का साजरी करू नये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला स्वत:च्या रक्षणासाठी 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

SCROLL FOR NEXT