Diwali Travel Plan  Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Travel Plan : भारतात या ठिकाणी दिवाळीचं खास सेलिब्रेशन, बजेटमध्ये फिरा फॅमिलीसोबत; वाचा सविस्तर

Diwali 2023 : दिवाळीत देशभरात झगमग पाहायला मिळते. अशातच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो.

Shraddha Thik

Diwali Vacation :

दिवाळीत देशभरात झगमग पाहायला मिळते. अशातच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. तसेच दिवाळीची सुटी ही फार मोठी असते त्यामुळे या वेळेला अनेकजण त्यांच्या फॅमेलीसह किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लान (Plan) करतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुम्हीही कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आम्ही काही ठिकाणे सांगणार आहोत जेथे दिवाळी (Diwali) मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. त्यामुळे तुम्ही अनेक ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान करू शकता. दिवाळीच्या काळात अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया कुठे जाता येईल.

अयोध्या

अयोध्येला रामाची नगरी म्हणतात. येथे राम वनवासातून परत आल्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. इथे दिवाळीच्या एक दिवस आधी छोटी दिवाळीला संपूर्ण शहर (City) दिव्यांच्या रोषणाईने सजवले जाते. दिवाळीच्या दिवशी राम अयोध्येला परतला. या आनंदात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गेल्या वर्षी येथे एकाच वेळी तीन लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याचा समावेश करण्यात आला.

वाराणसी

वाराणसीला शिवाची नगरी म्हणतात. इथे होळी किंवा दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. इथली होळी जगभर प्रसिद्ध आहे. दिवाळीबद्दल बोलायचे झाले तर बनारसमध्ये दिवाळी पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. येथे काशी विश्वनाथ मंदिरासह सर्व घाट सजवले जातात. इथे दिवाळीच्या काळात गंगा घाटांवर खूप गर्दी पाहायला मिळते. गंगा आरतीच्या वेळी येथे हजारो दिवे प्रज्वलित केले जातात.

कोलकाता

कोलकाता शहराला आनंदाचे शहर म्हटले जाते. येथे नवरात्रीनिमित्त लोकांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. तसेच दिवाळीच्या दिवशी येथे काली मातेची पूजा केली जाते. संपूर्ण शहरात दिवे आणि मेणबत्त्यांनी सजवले जाते. येथे तुम्ही शहरातील प्रसिद्ध काली पूजा मंडळ, कालीघाट मंदिर किंवा दक्षिणेश्वर मंदिरालाही भेट देऊ शकता.

गोवा

जर आपण गोव्याबद्दल बोललो तर येथे प्रत्येक सण अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्यामुळेच नवीन वर्ष, होळी, दिवाळी, ख्रिसमस आणि इतर अनेक सण साजरे करण्यासाठी लोक या शहरात येतात. पण इथे दिवाळी पारंपरिक दिवाळीपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. येथे या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर बरीच सजावट केली जाते. यासोबतच लाइव्ह शो आणि पार्ट्या आयोजित केल्या जातात.

अमृतसर

अमृतसरचे सुवर्णमंदिर दिवाळीच्या वेळी सुंदर सजवले जाते. येथे तुम्हाला दिवाळीचा सण वेगळ्या पद्धतीने साजरा करताना पाहायला मिळेल. येथील लोकांनी रात्रभर फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळेल.

उदयपूर

उदयपूरची दिवाळी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या काळात सरकारतर्फे येथे प्रकाशोत्सवाचे आयोजन केले जाते. इथे दिवाळीच्या दिवशी संपूर्ण उदयपूर लाईट आणि फटाक्यांनी सजवले जाते. या सुंदर सजावटीचे प्रतिबिंब पिचोळा नावाच्या तलावावर पडते तेव्हा ते अप्रतिम दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT