Diwali Sweet Dish Recipe google
लाईफस्टाईल

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

Oats Ladoo Recipe : नेहमीचे गोड पदार्थ पदार्थ खावून आपण कंटाळतो. आता आपण काही तरी स्पेशल आणि हेल्दी असा पदार्थ तयार करणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळी सण आता काही दिवसांवर आला आहे. आता प्रत्येक गृहिणी दिवाळीत कोण कोणते पदार्थ बनवायचे? या विचार असेलच. मात्र, सध्या लोकांच्या खाद्यपदार्थात काही बदल झाले आहेत. काही जण साखरेचे पदार्थ खाणे टाळतात. तर काही जण, तळलेले पदार्थ खाणे टाळतात. मग बनवायचं दिवाळीत नेमकं काय बनवायचं? याचा सगळ्यात मस्त उपाय आम्ही शोधला आहे. तुम्ही ओट्सचे साखर न वापरता लाडू तयार करु शकता.

साहित्य

१ वाटी ओट्स

१ वाटी खजूर

अर्धी वाटी बदाम

अर्धी वाटी काजू

२ टीस्पून जवसच्या बिया

१ टीस्पून चिया सिड्स

१ टीस्पून तूप

अर्धा टीस्पून वेलची पावडर

कृती

सर्वप्रथम एक नॉनस्टीकची कढई गॅस वर ठेवा. गॅस स्लो फ्लेमवर ठेवा. कढईत आता ओट्स टाका. ते व्यवस्थित भाजून घ्या. साधारण ३ ते ४ मिनिटांनी तुम्ही गॅस बंद करुन घ्या. आता भाजलेले ओट्स एका प्लेटमध्ये थंड करुन घ्या.

आता खजुर व्यवस्थित तुकडे करुन बारिक करुन घ्या. मग मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करा. आता पुन्हा नॉनस्टीकची कढई गॅस वर ठेवा. त्यात तुप टाका. आता कापलेले काजू बदाम , जवस आणि चिया सिड्स त्यात मिक्स करुन घ्या. दोन ते तीन मिनिटे हे पदार्थ तेलात परतुन घ्या.

आता कढईत खजुराची पेस्ट मिक्स करा. गॅस मध्यम आचेवरच असुद्या. हे मिश्रण एकत्र केल्यावर त्यात ओट्स आणि वेलची पूड मिक्स करा. ३ ते ४ मिनिटांनी गॅस बंद करा.

आता हे संपुर्ण मिश्रण एका प्लेट मध्ये काढून थोडे थंड करुन घ्या. मिश्रण थोडे कोमट झाल्यावर लाडु वळतो त्याप्रमाणे ते वळून घ्या. त्यांनतर १० मिनिटे लाडू सेट करायला ठेवा. चला तयार झाली खास लाडवांची रेसिपी.

Written By : Sakshi Jadhav

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT