colorful clothes  yandex
लाईफस्टाईल

Diwali 2024 : दिवाळीला कोणत्या रंगाचे कपडे ठरतील शुभ? जाणून घ्या राशीनुसार तुमच्या कपड्यांचा लकी रंग

colorful clothes : हिंदू धर्मात प्रत्येक रंगाला प्रचंड महत्व आहे. त्यानुसार आपण कपडे परिधान केले तर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्मानुसार आपण प्रत्येक सणाला नवीन कपडे परिधान करतो. नवीन वस्तुंची खरेदी करतो, नवीन दागिने खरेदी करतो. या सगळ्यात आपण कपड्यांकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. हिंदू धर्मात प्रत्येक रंगाला प्रचंड महत्व आहे. त्यानुसार आपण कपडे परिधान केले तर आपल्या अनेक अडचणी दूर होतात. मात्र अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही तुमच्या राशीनुसार कपड्यांचे रंग ठरवू शकता.

प्रत्येक सणाचे महत्व हिंदू धर्माने आपल्याला सांगितले आहे. त्याप्रमाणे आपण कपडे परिधान केले तर आपल्याला सकारात्मकता आणि प्रसन्नता मिळू शकते. तुम्ही जर तुमच्या राशीनुसार त्या रंगाचे कपडे परिधान केले तर, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होवू शकते. तसेच तुमची राशी तुम्हाला भविष्यात खूप फायदेशीर ठरु शकते. त्यासाठी तुम्ही पुढील रंगाचे कपडे परिधान करु शकता.

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार शुभ रंग

मेष

मेष राशीच्या स्रियांनी लक्ष्मी पुजनाला लाल रंगाचे कपडे परिधान करावे. तर पुरुषांनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.

वृषभ

वृषभ राशी असणाऱ्यांनी निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. हा रंग परिधान केल्याने लक्ष्मी माता नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील.

मिथून

मिथून राशी असणाऱ्यांनी लक्ष्मी पुजनाच्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करावे. हा रंग धन आकर्षित करणारा मानला जातो.

कर्क

ज्यांची रास कर्क आहे त्यांनी दिवाळीला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे. त्याचसोबत हिरव्या रंगाचे कपडे गरिबांना भेट देणे शुभ मानले जाईल.

सिंह

सिंह राशीचे लोक दिवाळीत पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करु शकता. हा रंग तुमच्या कुटुंबासाठी शूभ मानला जावू शकतो.

कन्या

कन्या रास असणार्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे शूभ ठरेल.

तूळ

तुळ राशीच्या लोकांनी निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. दिवाळीत हा रंग त्यांचे धन वाचवण्यास मदत करु शकतो.

वृश्चिक

वृश्चिक रास असणार्यांनी लक्ष्मी पुजनाला मरुन रंगाचे कपडे परिधान करावे.

धनू

धनू रास असणार्यांनी लक्ष्मी पुजनाला जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.

मकर

देवी लक्ष्मीची कृपा हवी असल्यास निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शूभ मानले जाते.

कुंभ

कुंभ राशी असणाऱ्यांनी गुलाबी किंवा ग्रे रंगाचे कपडे परिधान करावे.

मीन रास

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून लाल रंगाचे कपडे परिधान करावे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT