Health news: सकाळी अलार्म लावून उठत असाल तर सावध व्हा, नव्या रिपोर्टनं चिंता वाढली

Health news: सकाळी गजर लावून उठत असाल तर ही सवय तुमच्या जीवावर बेतू शकते. आम्ही असं का म्हणतोय हे तुम्हाला बातमी वाचून लक्षात येईल.
Alarm
Alarmsaam tv
Published On

सकाळची झोप ही प्रत्येकाला प्रिय असते. सकाळच्या झोपेतून उठू नये असं अनेकांना वाटतं. यासाठी सकाळी झोपेतून जाग यावी यासाठी आपण गजर लावतो. मोबाईलमध्ये किंवा गजराच्या घडाळ्याचा यासाठी वापर होतो. तुम्हीही कदाचित सकाळी गजर लावून उठत असाल. मात्र तुम्हाला माहितीये का, तुमची ही सवय तुम्हाला आजारी पाडतेय.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती सकाळचा गजर लावून उठतात त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचं समोर आलं आहे. युव्हीए स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, नैसर्गिकरित्या म्हणजेच अलार्म न लावता सकाळी उठणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत सकाळी अलार्म लावून उठल्याने रक्तदाब ७४ टक्के वाढू शकतो.

एका वेबसाईटला माहिती देताना न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितलं की, ज्या व्यक्ती ७ तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांच्यामध्ये रक्तदाबाची समस्या दिसून येते. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा रक्तबाद वाढतो तेव्हा हॉर्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका देखील वाढतो. एका संशोधनानुसार, अलार्म लावून सकाळी उठल्याने रक्तदाबाची समस्या वाढते.

Alarm
Breast cancer: ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कोणत्या महिलांना अधिक? ४० वर्षांपुढील महिलांनी 'ही' टेस्ट करावीच, तज्ज्ञांचा सल्ला

डॉ. कुमार पुढे म्हणाले की, ज्या व्यक्तींना पूर्वीपासून हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना हा धोका अधिक आहे. गजर वाजला की आपण उठतो. ज्यावेळी आपण झोपेतून अचानक जागे होते तेव्हा याचे परिणाम जोपेचे जडत्वमध्ये होऊ शकतो. यामध्ये व्यक्तीला झोपेतून उठल्यानंतर २ तास अस्वस्थ वाटण्याची समस्या जाणवू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com